गांजासह घातक शस्त्रांसह दोघांना अटक व कोठडी

पिस्तूल, गावठी कट्टा, सात काडतुसे, गांजा हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – गांजासह घातक शस्त्रांसह दोघांना कांजूरमार्ग आणि ठाणे येथून गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा, सात जिवंत काडतुसे, ३८ किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजा असा सुमारे सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजासह घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.

गुरुवारी १७ ऑक्टोंबरला भांडुपच्या मासेकोळी वसाहत, पल्लवी नरसिंहा रेड्डी यांच्या मालकीच्या रुममध्ये एक तरुण राहत असून त्याने त्याच्या राहत्या घरी घातक शस्त्रे ठेवल्याची माहिती युनिट सातच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून इम्रान यासीन खान ऊर्फ इनामदार ऊर्फ लोच्या याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस सापडले. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टाने सोमवार २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

त्याच्या चौकशीतून त्याला ते गावठी कट्टा त्याच्या ठाण्यातील मित्राने दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने ठाण्यातील माजीवाडा, साईनाथ नगर, रुस्तमजी अथेना इमारतीजवळ त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. चौकशीत तो गेल्या चार ते पाच वर्षांपासून भांडुप परिसरात गांजाचा विक्री करत होता. त्यासाठी त्याने स्वतसाठी एक पिस्तूल घेतले होते. त्यानंतर त्याच्या घरातून पोलिसांनी छापा टाकून तेथून एक देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि ३८ किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा असा सुमारे सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे दोन्ही कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करुन त्यांच्या गांजासह एक गावठी कट्टा, एक देशी बनावटीचे पिस्तूल, सात जिवंत काडतुसे आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक राजश्री बाळगी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेलार, नामदेव परबळकर, पोलीस हवालदार दिपक पवार, संतोष गुरव, सुभाष मोरे, शशिकांत कांबळे, गिरीश जोशी, विनोद शिरापुरी, सचिन गलांडे, विलास राऊत, प्रमोद जाधव, महिला पोलीस हवालदार सिमा तिरोडकर, पोलीस शिपाई प्रमोद शिंदे, जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार चालक संतोष धुमाळ, राजाराम कदम, पोलीस शिपाई चालक दिलीपराव राठोड यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page