मुंबई पोलीस दलातील ५८ पोलीस निरीक्षकांच्या नेमणूक

प्रतिक्षेत असलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई शहरातील बहुतांश पोलीस निरीक्षकांच्या मुंबईबाहेर बदल्या झाल्या तर काहींना मुंबईत बदली दाखविण्यात आली होती. मुंबईबाहेरुन आलेल्या ५८ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश अखेर सोमवारी जारी करण्यात आले आहेत. या सर्व पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन वरिष्ठांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर मुंबईसह इतर शहरातील बहुतांश पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधिक बदल्या मुंबई पोलीस दलात झाले होते. काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या बहुतांश पोलीस अधिकार्‍यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या होत्या. पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यामुळे निवडणुकीत मुंबईतील बहुतांश पोलीस ठाण्यात प्रमुखपदी अधिकारी नव्हता. त्यामुळे निवडणुक प्रचारासह मिरवणुक तसेच इतर राजकीय कार्यक्रमांदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असेल याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. या बदल्याच्या विरोधात काही अधिकारी मॅटकडे गेले होते, मात्र मॅटकडून संबंधित पोलीस अधिकार्‍यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे ते सर्व अधिकारी बदल्याच्या ठिकाणी रुजू झाले होते. त्यामुळे मुंबई शहरात बदल्या करण्यात आलेले बहुतांश पोलीस अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर सोमवारी रात्री त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.

ज्या ५८ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या कण्यात आल्या आहेत, त्या पोलीस अधिकार्‍यांची नावे पुढीलप्रमाणे
मिरा-भाईंदर-वसई-विरार येथील रमेश पंढरीनाथ भामे यांची अंधेरी पोलीस ठाणे, शैलेंद्र रघुनाथ नगरकर यांची मालवणी पोलीस ठाणे, जयराम नरसिंहराव रनवरे यांची कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, सदाशिव विष्णू निकम यांची आंबोली पोलीस ठाणे, राहुल उखाराम सोनावणे यांची विलेपार्ले पोलीस ठाणे, जिलानी कादर सय्यद यांची वाकोला पोलीस ठाणे, सचिन भरत कोतमिरे यांची डोंगरी पोलीस ठाणे, सुशीलकुमार अंकुशराव शिंदे यांची भायखळा पोलीस ठाणे, संतोष सोपान चौधरी यांची डी. एन नगर पोलीस ठाणे, विवेक शांताराम सोनावणे यांची दहिसर पोलीस ठाणे, शाम आदिनाथ आपेट यांची आझाद मैदान पोलीस ठाणे, चंद्रकांत सुधाकर सरोदे यांची एल. टी मार्ग पोलीस ठाणे, बाळासाहेब राघोजी पवार यांची चेंबूर पोलीस ठाणे, सुधीर अर्जुन चव्हाण यांची वनराई पोलीस ठाणे, जितेंद्र युवराज पाटील यांची भोईवाडा पोलीस ठाणे, अशोक कठाळू कांबळे यांची वरळी पोलीस ठाणे, शिवानंद शशिशंकर देवकर यांची व्ही. बी. नगर पोलीस ठाणे,मिलिं काळू सांबळे यांची मेघवाडी पोलीस ठाणे, मंगेश अरुणराव अंधारे यांची आरे पोलीस ठाणे, प्रकाश पांडुरंग मासाळ यांची दिडोंशी पोलीस ठाणे, कुमारगौरव माधवराव धादवड यांची डोंगरी पोलीस ठाणे, राहुलकुमार अरुण पाटील यांची आझाद मैदान पोलीस ठाणे,
नवी मुंबईचे अजय पांडुरंग कांबळे यांची नागपाडा पोलीस ठाणे, अविनाश एकनाथ काळदाते यांची घाटकोपर पोलीस ठाणे, श्रीकांत रेवणसिद्ध धरणे यांची धारावी पोलीस ठाणे, माणिक दामोधर नलावडे यांची शाहूनगर पोलीस ठाणे, तानाजी रामदास भगत यांची गोवंडी पोलीस ठाणे, रमेश लोटन जाधव यांची वडाळा टी टी पोलीस ठाणे, निर्मला शंकर पाटील यांची व्ही. पी रोड, संजय भिका चव्हाण यांची एमआयडीसी पोलीस ठाणे,चंद्रकांत बाळशिवराम लांडगे यांची आरसीएफ पोलीस ठाणे, सुनिल दत्तात्रय शिंदे यांची पार्कसाईट पोलीस ठाणे, संजय वामन जोशी यांची कांजूरमार्ग पोलीस ठाणे, बागवान अंजून कासिम यांची आरसीएफ पोलीस ठाणे, सुनिल दत्तात्रय कदम यांची कांजूरमार्ग, गिरीधर सिताराम गोरे यांची भोईवाडा पोलीस ठाणे,जगदीश सिताराम शेलकर यांची काळाचौकी पोलीस ठाणे, देवेंद्र रामचंद्र पोळ यांची व्ही. बी नगर पोलीस ठाणे, वैशाली अशोक गलांडे यांची वडाळा टी टी, अनिल प्रतापराव पाटील यांची मलबार हिल पोलीस ठाणे,
नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सुनिल माणिक बच्चाव यांची विशेष शाखा एक
मानपाड्याचे संजय शंकरराव नाळे यांची चेंबूर पोलीस ठाणे,
अकोला पीटीसीचे सचिन संभाजी खोंद्रे यांची डी. एन नगर पोलीस ठाणे,
मरोळ पीटीसीचे श्रीकांत गुणवंत आदाटे यांची कफ परेड पोलीस ठाणे, भास्कर अर्जुन पवार यांची पश्‍चिम नियंत्रण कक्ष,
खंडाळा पीटीसीचे सुरेखा शरद घारगे यांची निर्मलनगर पोलीस ठाणे, दिपाली अमीत मरळे यांची खार पोलीस ठाणे,
कोल्हापूरच्या पुष्पलता संपतराव मंडले यांची निर्मलनगर पोलीस ठाणे,
नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अशफाक अहमद नूर अहमद शेख यांची बांगुरनगर पोलीस ठाणे,
सोलापूरचे ऋषिकेश संपत पवळ यांची गोरेगाव पोलीस ठाणे,
पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे कुडलिक जगन्नाथ गाढवे यांची बांगुरनगर, अरविंद लयाप्पा कांबळे यांची बांगुरनगर पोलीस ठाणे,
ठाण्याचे विठ्ठल विरप्पा चौगुले यांची कुरार पोलीस ठाणे,
मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अरविंद वसंत पाटील यांची येलोगेट पोलीस ठाणे,
नाशिकचे नंदराज दिनकरराव पाटील यांची खार पोलीस ठाणे,
रा. नि. क. महाराष्ट्र राज्याचे मोहम्मद शफीक खाजाहुसैन बागवान यांची ताडदेव पोलीस ठाणे, नारायण महादेव पडवळ यांची आझाद मैदान पोलीस ठाणे,

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page