मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कुर्ला येथे राहणार्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आत्याच्या मुलाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २३ वर्षांच्या आरोपी नातेवाईकाविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला अद्याप अटक झाली नसून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पिडीत मुलगी अल्पवयीन असून ती तिच्या कुटुंबियांसोबत कुर्ला परिसरात राहते. तिची आत्या औरंगाबाद येथे राहत असून आरोपी हा तिच्या आत्याचा मुलगा आहे. फेब्रुवारी महिन्यांत तो औरंगाबाद येथून त्यांच्याकडे घरी आला होता. २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घरात कोणीही नसताना त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगून तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. सहा दिवसांत त्याने तिच्यावर चार ते पाच वेळा लैगिंक अत्याचार करुन हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या पोटात वेदना होऊ लागले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला कुर्ला येथील नेहरुनगर परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले होते. तिथे तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचे उघडकीस आले.
तिची चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने ही माहिती नंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून चुन्नाभट्टी पोलिसांना देण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या मुलीची जबानी नोंदवून पोलिसांनी २३ वर्षांच्या आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला अटक झाली नसून त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान पिडीत मुलीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोळा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार
कांदिवलीतील अन्य एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच गणेश नावाच्या १९ वर्षांच्या आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. पिडीत मुलगी मालाड येथे राहत असून तिची सोशल मिडीयावरुन गणेशशी ओळख झाली होती. त्यातून ते दोघेेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते. २६ ऑगस्टला ते दोघेही कांदिवलीतील गणेशच्या घरी भेटले होते. यावेळी त्याच्या घरी कोणीही नव्हते. ही संधी साधून त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने समतानगर पोलिसांत गणेशविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.