मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बालविवाह केलेल्या अल्पवयीन पत्नीवर जबदस्तीने लैगिंक अत्याचार करुन तिला गर्भवती होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्या पतीसह नातेवाईक आणि लग्न लावणार्या पंडित अशा चौघांविरुद्ध ताडदेव पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ३५ (३) अन्वये नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. दरम्यान पिडीत मुलीवर कामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. आजारी असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडीत मुलगी सध्या अठरा वर्षांची असून तिचे वय सतरा असताना तिच्या आईसह नातेवाईकांनी तिचे अमर नावाच्या एका ३० वर्षांच्या तरुणाशी लग्न लावू दिले होते. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोघांचे लग्न वरळीतील एका मंदिरात झाले होते. लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत ताडदेव येथील बेलासिस रोडवर राहत होता. तिथेच तिच्या पतीने तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिला कामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे मेडीकलनंतर ती गरोदर असल्याचे उघडकीस आले. ही मुलगी अल्पवयीन असल्याचा संशय आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून ही माहिती ताडदेव पोलिसांना देण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पिडीत मुलीची जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला होता. महानगरपालिकेच्या डी वार्डकडून तिच्या जन्माचे प्रमाणपत्र पोलिसांना प्राप्त झाले असून त्यात तिची जन्मतारीख १३ जुलै २००६ अशी आहे. त्यामुळे ती अल्पवयीन असल्याची माहिती असताना तिच्या आईसह इतर नातेवाईकांनी तिचे अमर नाावाच्या ३० वर्षांच्या तरुणाशी बालविवाह लावून दिला होता. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांच्या वतीने तिच्या पतीसह चौघांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह बालविवाह आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार
दुसर्या घटनेत एका तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैभव या तरुणाविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर परिसरात राहते. मार्च महिन्यांत तिच्या मैत्रिणीने तिची ओळख वैभवशी करुन दिली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिच्यासह तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तिला तिच्या आईने जवळच्या शासकीय रुग्णालयात नेले होते. तिथे तपासणी केल्यानंतर ही मुलगी गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत तिची चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर या महिलेने घाटकोपर पोलीस ठाण्यात वैभवविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी वैभवविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.