मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील एका दुकलीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. शमीम नसीम खान आणि अमजद रजा हैदर अली अन्सारी अशी या तिघांची नावे असून ते दोघेही गोवंडीतील शिवाजीनगरचे रहिवाशी आहेत. यातील अमजद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दोन गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सॅम्युअल सॅमसन डिसुजा हा 21 वर्षांचा तरुण सांताक्रुज येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी 28 फेब्रुवारीला तो रिक्षातून अंधेरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, डिलाईट हॉटेलच्या दक्षिण वाहिनीवरुन जात होता. यावेळी बाईक्वरुन दोन तरुणांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाईल खेचून पलायन केले होते. त्याने आरडाओरडा करुन रिक्षातून दोघांचा पाठलाग केला, मात्र ते दोघेही सुसाट वेगाने पळून गेले. या घटनेनंतर त्याने अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या शमीम खान आणि अहमद अन्सारी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत दोघांचाही सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांनाही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. तपासात वीस वर्षांचे शमीम आणि अमजद हे गोवंडीतील शिवाजीनगरचे रहिवाशी आहे. शमीम हा काहीच कामधंदा करत नाही तर अमजद हा टेलर काम करतो. त्याच्याविरुद्ध देवनार पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.