तरुणीवर कंपनीच्या सहकार्‍याकडून लैगिंक अत्याचार

लैगिंक अत्याचारासह खंडणीप्रकरणी सहकार्‍याला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – अंधेरी येथे राहणार्‍या एका तरुणीवर तिच्याच कंपनीच्या सहकार्‍याकडून लैगिंक अत्याचार करुन खंडणी वसुलीचा प्रकार घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह खंडणीचा गुन्हा दाखल होताच परमजीतसिंग तरलोकचंदसिंग कलसी या 37 वर्षांच्या आरोपी सहकार्‍याला साकिनाका पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. आरोपीने पिडीत तरुणीच्या मोबाईलवरुन जीपेद्वारे पन्नास हजार रुपये ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र चुकीचा पीन क्रमांक दिल्याने त्याने तिला बेदम मारहाण केल्याचे तपासात उघडकीस आले.

पिडीत तरुणी ही अंधेरी परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. याच कंपनीत 37 वर्षांचा परमजीतसिंग कलसी हा कामाला आहे. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. याच ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. शुक्रवारी 7 मार्चला परमजीतसिंगने तिला त्याच्या कारमध्ये जबदस्तीने बसविले होते. त्यानंतर तो तिला घेऊन साकिनाका येथील एका हॉटेलमध्ये घेऊन आला होता. तिथेच त्याने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर तिच्या मोबाईलवरुन त्याच्या बँक खात्यात जीपेद्वारे पन्नास हजार रुपये ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला होता. तिने चुकीचा पीन क्रमांक दिल्याने त्याने तिला हॉटेलमध्ये बेदम मारहाण केली होती.

या घटनेनंतर त्याने तिला धमकी देऊन सोडून दिले होते. घडलेल्या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. परमजीतसिंगकडून ब्लॅकमेल होण्याची तसेच तिच्यावर पुन्हा लैगिंक अत्याचार होण्याची भीती वाटल्याने तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी तिने घडलेला प्रकार साकिनाका पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची तिथे उपस्थित पोलिसांनी गंभीर दखल घेत परमजीतसिंग कलसीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याला त्याच्या राहत्या घरातून रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. परमजीतसिंग हा जोगेश्वरीतील मजाज डेपोजवळील तिवारी चाळीत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page