शेअर गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणार्या तिघांना अटक
सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा तिघांवर आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2025
मुंबई, – तीस टक्के परताव्याचे गाजर दाखवून एका शेअर ट्रेडिंग व्यावसायिकाला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन सुमारे 61 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी तीनजणांच्या एका टोळीला उत्तर प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी अटक केली. लाछेन शॉपी, भिमबहादूर प्रधान आणि रमेशकुमार अभिमन्यू अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांवर सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप असून अटकेनंतर या तिघांनाबोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या चौकशीतून इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एका खाजगी कंपनीच्या ग्रुपमध्ये अनेकांना अॅड करुन या टोळीने शेअरमध्ये चांगला परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
51 वर्षांचे सुनिलकुमार सज्जनकुमार मिश्रा हे गोरेगाव परिसरात राहत असून शेअर ट्रेडिंगचे काम करतात. 22 नोव्हेंबरला ते तंच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात मोबाईलवरुन ट्रेडिंग टायटन ऑफ दलाल या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्याताअले होते. या ग्रुपमध्ये दोनशेहून अधिक सभासद होते. बहुतांश सभासद ऑनलाईन होते, ग्रुपच्या माध्यमातून सभासदांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत शिकवणी दिली जात होती. प्रोफेसर राजीव बत्रा या व्यक्तीने संबंधित गु्रप बनविला होता. त्यात अनेक सभासदांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले जात होते. अशाच प्रकारे त्यांनाही गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले होते. त्यासाठी त्यांचे अकाऊंट उघडण्यासाठी एक लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक ओपन करुन त्यांची वैयक्तिकसह बँक खात्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या नावाने अकाऊंट रजिस्ट्रर झाले होते. गुंतवणुकीवर अनेकांना चांगला फायदा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते, त्यामुळे या ग्रुपच्या माध्यमातून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतलाद होता.
23 डिसेंबर 2024 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत त्यांना विविध आयपीआमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन 61 लाख 31 हजार रुपयांची गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या गुंतवणुकीवर त्यांना तीस टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बरेच प्रयत्न करुनही त्यांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता आली नव्हती. याबाबत त्यांनी कस्टमर सपोर्ट व्हॉटअप क्रमांकावर संपर्क साधला असता ही रक्कम काढण्यासाठी त्यांना आधी 21 टक्के टॅक्सची रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले.
हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी ती रक्कम भरण्यास नकार दिला होता. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा उत्तर प्रादेशिक सायबर सेलकडून तपास सुरु होता. तपासादरम्यान तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी लाछेन शॉपी, भिमबहादूर प्रधान आणि रमेशकुमार अभिमन्यू या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत या तिघांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यता आली.
तपासात ते तिघेही अशाच प्रकारे फसवणुक करणार्या काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाती उघडली होती. याच खात्यात फसवणुकीची रक्कम जमा केली जात होती. ही रक्कम सायबर ठगांना ट्रान्स्फर केल्यानंतर या तिघांनाही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहै.