मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2025
मुंबई, – दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या एका रिक्षाचालकाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे.
45 वर्षांची तक्रारदार महिला मालाडच्या मालवणी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. दहा वर्षांची पिडीत तिची मुलगी असून ती शाळेत जाते. याच परिसरात 37 वर्षांचा आरोपी राहत असून तो रिक्षाचालक म्हणून काम करतो. एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत आरोपीने पिडीत दहा वर्षांच्या मुलीला विविध कारण सांगून घरी बोलाविले होते. घरी आल्यानंतर तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता. अनेकदा तिचे कपडे काढून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार तिने कोणालाही सांगून नये म्हणून त्याने तिला मारहाण करण्याची धमकी दिली होती. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.
अलीकडेच घडलेला प्रकार मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजला होता. ही माहिती समजताच तिने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होात. गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री आरोपीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
लैगिंक अत्याचारानंतर अल्पवयीन प्रेयसीकडे पैशांची मागणी
लैगिंक अत्यारानंतर चौदा वर्षांच्या अल्पवयीन प्रेयसीकडे 25 हजाराची मागणी करुन तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी 20 वर्षांच्या आरोपी प्रियकराविरुद्ध अॅण्टॉप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 14 वर्षांची पिडीत मुलगी सायन-कोळीवाडा परिसरात राहत असून आरोपी तिचा प्रियकर आहे. ते दोघेही एकाच परिसरात राहतात. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. 1 जानेवारी ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत त्याने तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करुन पंचवीस हजाराची मागणी करत होता. बदनामीच्या भीतीने तिने त्याला 25 हजार रुपये दिले होते. तरीही तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. तसेच पैसे दिले नाहीतर तिला पाहून घेण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने अॅण्टॉप हिल पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी प्रियकराविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.