मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – अश्लील चाळे करुन एका नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच ३६ वर्षांच्या आरोपीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बळीत मुलगी आणि आरोपी एकाच इमारतीमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
३६ वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरी परिसरात राहत असून तिला नऊ वर्षांची मुलगी आहे. तिच्याच इमारतीमध्ये ३६ वर्षांचा आरोपी राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता ही मुलगी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिला आईस्क्रिम देण्याचा बहाणा करुन घर दाखवायला चल असे सांगून बाजूला नेले. त्यानंतर त्याने तिला नकोसा स्पर्श करुन तिच्या छातीसह पार्श्व भागाववर अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिच्या गालावर वारंवार चुकीच्या पद्धतीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरल आणि तिने घरी गेल्यानंतर हा प्रकार तिच्या आईला सांगितला. मुलीकडून ही माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने अंधेरी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध ७४ भारतीय न्याय सहिता सहकलम ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.