अंधेरीत चालणार्‍या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

वेश्यादलालास अटक तर महिलेची पोलिसांकडून सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 मे 2025
मुंबई, – अंधेरीत चालणार्‍या एका ऑनलाईन सेक्स रॅकेटचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका 28 वर्षांच्या वेश्यादलालास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या तावडीतून एका महिलेची सुटका केली आहे. मेडीकलनंतर या महिलेची कांदिवलीतील एका खाजगी रेस्क्यू सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे. सर्फराज ऊर्फ मोहम्मद गुलाब फुलबाबू शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध भान्याससह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या वृत्ताला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चौधरी यांनी दुजोरा दिला आहे.

सर्फराज हा अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहत असून तो ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत असून ग्राहकांच्या मागणीनुसार काही तरुणींना विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस वेश्याव्यवसायासाठी पाठवतो. हा संपूर्ण व्यवहार फोनवरुन चालत असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चौधरी यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आंबोली पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने सर्फराजला संपर्क साधला होता. त्याच्याकडे काही तरुणींची मागणी करण्यात आली होती. यावेळी सर्फराजने त्याला व्हॉटअपवर काही तरुणीचे फोटो पाठविले होते. त्यातील काही तरुणींची निवड करुन या बोगस ग्राहकाने त्याच्याशी फोनवरुनच सर्व आर्थिक व्यवहार केला होता. त्यानंतर त्याला या तरुणीला घेऊन घेऊन अंधेरीतील विरा देसाई रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते.

शनिवारी रात्री उशिरा तिथे सर्फराज हा एका तरुणीसोबत आला होता. त्याचे बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक देवकाते, बंडगर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खलाटे, पोलीस हवालदार पवार, पाटील, महिला पोलीस हवालदार पालांडे यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कारवाईत पोलिसांनी 30 वर्षांच्या महिलेची सुटका केली. तिच्या चौकशीतून सर्फराज हा तिला वेश्याव्यवसायासाठी तिथे घेऊन आल्याचे उघडकीस आले.

या घटनेनंतर पोलीस हवालदार प्रविण नारायण पाटील यांच्या तक्रारीवरुन आंबोली पोलिसांनी सर्फराजविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता तसेच पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बळीत महिलेची मेडकीलनंतर कांदिवलीतील रेस्क्यू सेंटरमध्ये रवानगी करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चौधरी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page