मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 एपिल 2025
मुंबई, – बालविवाह केलेल्या अल्पवयीन पत्नीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी पतीला अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांविरुद्ध अॅण्टॉप हिल पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत इतर चार आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. दुसरीकडे अटकेत असलेल्या आरोपी पतीला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
20 वर्षांचा आरोपी तरुण अॅण्टॉप हिल परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. पिडीत मुलगी अल्पवयीन असून तिचे सध्या वय सतरा आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आरोपीचे पिडीत मुलीशी सप्टेंबर 2024 रोजी बालविवाह लावून दिला होता. विवाहानंतर ती तिच्या पतीसोबत अॅण्टॉप हिल येथील घरी आली होती. सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत तिच्यावर तिच्या पतीने तिच्या मनाविरुद्ध जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार अलीकडेच अॅण्टॉप हिल पोलिसांना समजला होता. या माहितीनंतर पोलिसांनी दोघांच्या आई-वडिलांसह आरोपी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कारवाईत पिडीत मुलीची पोलिसांची सुटका केली होती.
चौकशीत पिडीत मुलीचे वय सतरा वर्ष दोन महिने आहे. ती अल्पवयीन असताना त्यांच्या पालकांनी त्यांचा बालविवाह लावून दिला होता. बालविवाहानंतर या मुलीवर तिच्या पतीने अनेकदा जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांच्या वतीने अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह त्याचे आई-वडिल आणि पिडीत मुलीचे आई-वडिल अशा पाचजणांविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पतीला पोलिसांनी अटक केली तर इतर चौघांना चौकशीनंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.