मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जून २०२४
मुंबई, – पवई पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अतुल बापूसाहेब कुंभार यांची मुलगी भार्गवी अतुल कुंभार हिला यंदा दहावीच्या परिक्षेला ९८.२० टक्के मिळाले आहे. अंधेरीतील कनोसा कॉन्व्हेट हायस्कूलमध्ये भार्गवी पहिली आली असून मरोठ पोलीस कॅम्प पोलीस वसाहतीत इतके गुण मिळविणारी ती पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे. भार्गवीच्या या यशाबाबत तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अंधेरीतील महानगर दंडाधिकार्यासह पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सर्वच पोलिसांनी तसेच शाळेतील शिक्षकांनी भार्गवीचे कौतुक करुन तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अतुल कुंभार हे पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असून सध्या त्यांची नेमणूक अंधेरीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी ६६ वे न्यायालयात आहे. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील मरोळ पोलीस कॅम्प पोलीस वसाहतीत राहतात. भार्गवी ही त्यांची मुलगी असून ती महाकाली गुंफा परिसरातील कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती. मार्च महिन्यांत तिने दहावीची परिक्षा दिली होती. मे महिन्यांत परिक्षेचा निकाल लागल्यानंतर भार्गवीला दहावीला ९८.२० टक्के मिळाले होते. तिला मिळालेले यशामुळे कुंभार कुटुंबियांना तिचा प्रचंड अभिमान आहे. अभ्यासाची आवड आणि आई अर्चना हिचे योग्य मार्गदर्शनामुळे भार्गवीला हे यश मिळाल्याचे बोलले जाते. शाळेत पहिली असलेली भार्गवी ही मरोळ पोलीस कॅम्प वसाहतीसह कुंभार कुटुंबात ९८.२० टक्के मिळालेली पहिलीच मुलगी ठरली आहे. या यशाबाबत तिचे महानगर दंडाधिकाी विजय गवई, एसीएमएएम गायकवाड, डांगे, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी तसेच शाळेतील सर्वच शिक्षकांनी भार्गवीचे मार्गदर्शन करुन कौतुक केले. तसेच तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. भार्गवीला व्हॉलीबॉलची आवड आहे. २०२३ साली कोलकाता येथे झालेल्या सोळा वर्षांच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत तिने भाग घेतला होता. त्यात तिला सिल्व्हर मेडल मिळाले होते. आयआयटी क्षेत्रात तिला करिअर करायचे आहे असे तिचे वडिल अतुल कुंभार यांनी सांगितले.