मदतीचा बहाण्याने ३९ वर्षांच्या महिलेवर लैगिंक अत्याचार

प्रियकरासह दोन बंधूंविरुद्ध लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – मदतीच्या बहाण्याने एका ३९ वर्षांच्या महिलेवर तिच्याच प्रियकरासह मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकरासह त्याच्या भावाविरुद्ध बोरिवली पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह सात लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रविण भिकू पटेल आणि शैलेश सुरेश खारवा पटेल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही कांदिवलीतील चारकोप परिसरातील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पिडीत महिला ही बोरिवली परिसरात राहते. तिने तिच्या घराचे पक्के बांधकाम केले होते. जून २०२२ रोजी तिच्या घराच्या बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून महानगरपालिकेने निष्कासित करण्याबाबत तिला नोटीस पाठविली होती. यावेळी तिने तिचे पूर्वी प्रेमसंबंध असलेल्या प्रविण पटेलला ही माहिती सांगून मदत करण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने तिची ओळख तिचा भाऊ शैलेश पटेलशी करुन दिली होती. त्याला जमिनीच्या व्यवहाराची ज्ञान असल्याचे सांगून तो तिची मदत करेल असे सांगितले होते. त्यामुळे तिने त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांना मदत करण्यास सांगितले होते. त्यानंतर या दोघांनी त्यांच्या परिचित वकिल करुन दिले होते. या वकिलाच्या मदतीने तिने दिडोंशीतील दिवाणी कोर्टात एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने तिच्या बांधकाम निष्कासित करण्यावर स्टे आणला होता. त्यानंतर या याचिकेवर सुनावणी सुरु होती.

याच दरम्यान प्रविण पटेलने तिच्या अनधिकृत जागेवर राहत असल्याचा दिडोंशी कोर्टात दावा केला होता. या याचिकेवरही सुनावणी सुरु होती. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने या दोघांनाही त्यांची याचिका मागे घेण्याची विनंती केली. यावेळी या दोघांनी तिला दावा मागे घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर या दोघांनी तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध अनेकदा आळीपाळीने लैगिंक अत्याचार केला होता. कोर्टाचे कामकाजाचे कारण सांगून तिच्याकडून सात लाख रुपये घेतले, ही रक्कम तिला परत न करता सात लाखांचा अपहार केला होता. याच दरम्यान ते दोघेही तिच्या नियमित संपर्कात होते, तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिच्याकडून पैसे घेत होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून तिने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली नव्हती. मात्र काही महिन्यानंतर या दोघांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडे तिचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार केली होती. त्याचा तिला प्रचंड मनस्ताप झाला होता.

या दोघांनी तिच्यावरील जागेचा दावा मागे घेण्याचे आश्‍वासन देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला, तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केली. तसेच तिच्याविरुद्ध नवी दिल्लीत तक्रार करुन तिचे मानसिक व शारीरिक शोषण केले. या दोघांच्या शोषणाला कंटाळून तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने दोन दिवसांपूर्वी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती.या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिचा माजी प्रियकर प्रविण पटेल आणि त्याचा भाऊ शैलेश पटेल या दोघांविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page