आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकराला अटक

शासकीय वसतिगृहात कॉलेज विद्यार्थिनीची आत्महत्याप्रकरण

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गेल्या महिन्यांत चेंबूरच्या शासकीय वसतिगृहात दिक्षा कल्पेश कांबळे या तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर धनंजय ललित तळवडेकर (२३) याला चेंबूर पोलिसांनी अटक केली. धनंजयकडून दिक्षाचा क्षुल्लक कारणावरुन मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले. तिच्या आत्महत्येनंतर तब्बल एक महिन्यानंतर धनंजयविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्याला रविवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्पेश बाळकृष्ण कांबळे हे सिंधुदुर्गच्या देवगडचे रहिवाशी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत तिथे राहतात. सध्या ते एसटी महामंडळात चालक म्हणून नोकरीस आहे. त्यांची दिक्षा ही वरळीच्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने ती सध्या चेंबूरच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या माता रमाबाई आंबेडकर या मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहत होती. मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर, महात्मा ज्योतिबा सहकारी सोसायटीत राहणारा धनंजय हा त्यांच्या गावचा असल्याने त्याची दिक्षासोबत ओळख होते. ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. ७ ऑक्टोंबरला दिक्षा ही नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला आणि सायंकाळी वसतिगृहात परत आली होती. काही वेळानंतर तिने वसतिगृहातील तिच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहितीनंतर पोलिसांकडून त्यांना समजली होती. त्यामुळे ते गावाहून मुंबईत आले होते. मुलीच्या आत्महत्येने कांबळे कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली नव्हती.

सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर त्यांची दुसरी मुलगी वैभवीकडून त्यांना दिक्षा ही धनंजयच्या संपर्कात होती. त्याच्यासोबत तिचे नेहमीच मोबाईल संभाषण सुरु होते. मात्र काही महिन्यांपासून तिच्या स्वभावात प्रचंड बदल झाला होता. याबाबत अनेकदा विचारणा करुनही दिक्षाने तिला काहीच सांगितले नव्हते. काही दिवसांनी दिक्षाने धनंजयसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली होती. अनेकदा त्यांच्यात भांडण झाल्यानंतर धनंजय वैभवीला कॉल करत होता. यावेळी ती त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करायची. मात्र त्यांच्यात सतत खटके उडत होते. त्यामुळे तिने त्याचे कॉल घेणे बंद केले होते. याच कारणावरुन तो तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करत होता. अनेकदा तो तिच्या वसतिगृहाजवळ येऊन तिच्याशी वाद घालत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडून तिचा प्रचंड मानसिक शोषण सुरु होता. या शोषणाणा दिक्षा ही कंटाळून गेली होती. त्यातून तिला मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

हा प्रकार वैभवीकडून समजताच कल्पेश कांबळे यांनी दिक्षासोबत राहणार्‍या तिच्या मैत्रिणीची चौकशी केली होती. यावेळी या मैत्रिणीने धनंजयकडून दिक्षाचा मानसिक शोषण सुरु असल्याचे समजले होते. तो तिला सत शिवीगाळ करुन धमकी देत होता. त्यांच्यातील भांडण त्यांनी अनेकदा पाहिल्याचे सांगितले. या संपूर्ण घटनेनंतर दिक्षाच्या आत्महत्येला धनंजय तळवडेकर हाच जबाबदार असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून धनंजयविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांनी धनंजय तळवेडकर याच्याविरुद्ध दिक्षाचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच धनंजयला मानखुर्द येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page