डिजीटल अरेस्टची भीती दाखवून निवृत्त रेल्वे मॅनेजरची फसवणुक

सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या सांगलीच्या तरुणाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – रेल्वेतून स्टेशन मॅनेजर म्हणून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध अधिकार्‍याला मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून फसवणुक केल्याच्या कटात विकास संभाजी चव्हाण या 28 वर्षांच्या आरोपी तरुणाला मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. विकास हा सांगलीचा रहिवाशी असून त्याने सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

65 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार रविंद्र बंधन चौहाण हे अ‍ॅण्टॉप हिल परिसरातील रहिवाशी आहेत. ते रेल्वेमध्ये मॅनेजर म्हणून निवृत्त झाले असून सध्या त्यांच्या पत्नीसोबत राहतात. 14 एप्रिल 2025 रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना दिल्ली पोलीस मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीने कॉल केला होता. त्यांच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात फसवणुक झाली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ते स्वत पोलीस उपायुक्त भुपेशकुमार आणि राजीवकुमार हे करत आहेत. यावेळी त्याने त्यांचा कॉल त्यांच्या वरिष्ठांना ट्रान्स्फर केला होता. त्यानंतर त्यांच्याशी भुपेशकुमार नावाच्या व्यक्तीने संभाषण सुर केले होते. त्यांच्या बँक खात्यातून मनी लॉड्रिंगझाले असून ही केस माजी मंत्री नवाब मलिक, हसीना पारकर यांच्याशी संंबंधित आहे. त्याचा केससह तक्रार क्रमांक त्यांना पाठविला होता.

गुन्हा दाखल होताच मनिष यादव या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जबानीतून त्यांच्या बँक खात्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या बँक खात्यात दोन कोटी रुपये ट्रान्स्फर झाले होते. यावेळी त्यांनी ते सांगत असलेल्या बँक खात्याशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. तरीही त्याने त्यांना त्यांच्या व्हॉटअप क्रमाकांवर काही कागदपत्रे पाठविली होती. त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर दिल्ली पोलिसांची नजर आहे. त्यांना अटकेची भीती दाखवून त्याने त्यांना त्यांच्याविरुद्ध कोर्टाने जारी केलेले अटक वॉरंट दाखविले. चौकशी पूर्ण होईलपर्यंत ते त्यांच्या घरी डिजीटल अरेस्ट असल्याचे सांगितले.

या प्रकारानंतर त्यांच्यासह त्यांची पत्नी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढण्याची विनंती केली होती. त्याने त्यांना त्यांच्या बँक खात्याच्या फंड व्हेरीफिकेशन करण्यासाठी काही रक्कम ट्रान्स्फर करावी लागेल, ती रक्कम 72 तासांत त्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून त्यांना 15 लाख रुपये आरटीजीएस केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांना शंका आली होती. त्यामुळे त्यांनी त्यांचा मेहुणा ओमप्रकाश चौहाणला ही माहिती सांगितली. त्याने त्यांची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचे सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासात ही रक्कम गुवाहटीच्या सिल्पुखुरीच्या एका बँक खात्यात जमा झाली होती. त्यापैकी पाच लाख रुपये एका बँक खात्यात तर उर्वरित रक्कम एटीएमच्या माध्यमातून काढण्यात आली होती. या बँक खात्याची माहिती काढत असातना पोलिसांनी विकास चव्हाणला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. विकास हा सांगलीच्या खानपूरर, बलकडीच्या तांदळगावचा रहिवाशी आहे. त्याच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर त्याने ती रक्कम सायबर ठगांना पाठविल्याचे उघडकीस आले.

काही सायबर ठगांच्या विकास हा संपर्कात होता. फसवणुकीसाठी त्याने त्यांना बँक खात्याची डिटेल्स दिली होती. याच बँक खात्यात नंतर फसवणुकीची रक्कम जमा केली जात होती. या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 13 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश हेंबाडे, पोलीस हवालदार विकास तटकरे, अभिजीत गोंजारी, सुजीत सावंत यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page