आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश
४.८४ कोटीच्या सोन्यासह दोन कर्मचार्यासह चौघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जानेवारी २०२५
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन कर्मचार्यांसह दोन रिसीव्हर्स अशा चौघांना या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी ४ कोटी ८४ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर चारही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यत आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्युटी फ्री कार्यरत असलेल्या काही कर्मचारी हे सोने तस्करीच्या सिंडिकेट मध्ये असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. त्या माहितीनंतर सोने विमानतळावर बाहेर नेणाऱ्या दोन विमानतळ कर्मचारी आणि दोन रिसिव्हर्सना डीआरआय ने ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून ५ अंडाकृती कॅप्सूल आणि मेणाच्या स्वरूपातील सोने असलेली दोन पाकीट जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ४ कोटी ८४ लाख रुपये इतकी आहे. त्या चौघांचे सीमा शुल्क कायद्यानुसार जबाब नोंद करून त्याना अटक केली.