ई-बाईक चालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांची मोहीम

१९६३ गुन्हे दाखल करुन ६७२ ई बाईक जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – वाहतूक नियमांचे उल्लघंन करुन इतर वाहनचालकाच्या जिवीतास धोका निर्माण करणार्‍या बाईक आणि कारचालकानंतर मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी आता ई-बाईक चालकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेतर्गत गेल्या दहा दिवसांत १९६३ गुन्ह्यांची नोंद करुन पोलिसांनी ६७२ ई बाईक जप्त केल्या आहेत. या चालकांकडून लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ई बाईक चालकाविरुद्ध विशेषता डिलीव्हरी बॉय चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लघंन केले जात असल्याचा काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा ई बाईक चालकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीत २२१ गुन्हे दाखल करुन वाहतूक पोलिसांनी २९० ई-बाईक जप्त केल्या होत्या. या कारवाईत १ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला होता. त्यांच्याकडून २९० बाईक जप्त करण्यात आले. २७२ चालकाविरुद्ध दिशेने बाईक चालविणे, ४९१ चालकावर सिग्नल जम्पिंग करणे, २५२ चालकावर नो इंट्रीमध्ये प्रवेश करणे तसेच स्थानिक १६१ अशा १ हजार १७६ चालकावर कारवाई करण्यात आली होती.

या कारवाईनंतरही काही ई बाईक चालक वाहतूक नियमांचे उल्लघंन करुन इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य करत होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पुन्हा अशा चालकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. १८ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्‍या चालकाविरुद्ध १८१ गुन्हे, स्थानिक गुन्हे १९६३ दाखल करण्यात आले होते. या कारवाईत ६७२ ई बाईक्स जप्त करण्यात आले. तसेच १८० हून अधिक डिलीव्हरी बॉयविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page