बुक केलेल्या फ्लॅटची विक्री करुन वयोवृद्धासह दोघांची फसवणुक

1.87 कोटीच्या फसणुकीप्रकरणी विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्‍या व्यक्तींना विक्री करुन एका वयोवृद्धासह जोडप्याची 1 कोटी 87 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या दोन संचालक विकासकाविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुक व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिहीर अशोक जंठवा आणि अशोक जंठवा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही त्रिवेणी डेव्हलपर्सचे संचालक आहेत. याच गुन्ह्यांत या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

संडुर ही घटना मे 2016 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीत बोरिवलीतील कुलूपवाडी, त्रिवेणी कॉन्टर, न्यू शिवकृपा सीएचएसएलमधील कंपनीच्या कार्यालयात घडली होती. गुरुराजा हनुमंत राव हे 73 वर्षांचे वयोवृद्ध बोरिवलीतील दत्तपाडा रोड परिसरात राहतात. ते सध्या निवृत्त झाले असून घरीच असतात. नऊ वर्षांपूर्वी त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यासाठी ते एका नवीन फ्लॅटच्या शोधात होते. याच दरम्यान त्यांना त्रिवेणी डेव्हलपर्स या बांधकाम कंपनीकडून बोरिवली येथे एका सहकारी सोसायटीच्या पुर्नविकास इमारतीचे बांधकाम सुरु असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी संबंधित बांधकाम साईटवर भेट घेतली होती.

या भेटीदरम्यान तिथे इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कंपनीचे संचालक मिहीर जंठवा आणि अशोक जंठवा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रोजेटच्या ए विंगच्या 19 व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1901 फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. याच फ्लॅटसाठी संडुर राव यांनी त्यांना 1 कोटी 51 लाख रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांना फ्लॅटचे अ‍ॅलोटमेंट लेटर देण्यात आले होते.

मात्र काही वर्षांनी त्यांना जंठवा यांनी त्यांनी बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विक्री केल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांनी त्यांना दुसर्‍या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन देताना त्यांना ऑगस्ट 2023 रोजी या फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले. मात्र त्यांनी या इमारतीचे प्रोजेक्ट पूर्ण केले नाही. त्यामुळे ते प्रोजेक्ट अद्याप अर्धवट राहिलेले आहे.

याच दरमन त्यांना मिहीर जंठवा आणि अशोक जंठवा यांनी त्यांच्या परिचित नेहल पटेल आणि तिचे रितेश पटेल यांनाही न्यू शिवकृपा सहकारी सोसायटीमध्ये बी विंगमध्ये एक फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते, त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून 36 लाख 18 हजार रुपयांचे पेमेंट घेतले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनाही फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. त्यांचाही फ्लॅट त्यांनी दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन पटेल पती-पत्नीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संडुर राव आणि नेहल पटेल यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती.

मात्र जंठवा यांनी त्यांचे पैसे दिले होते. फ्लॅटसाठी घेतलेल्या 1 कोटी 87 लाख रुपयांची फसवणुक करुन त्यांनी या दोघांची फसवणुक केली होती. फसवणुकीनंतर त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मिहीर जंठवा आणि अशोक जंठवा या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोन्ही संचालकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचात तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page