सहा वर्षांच्या मुलीवर शेजार्याकडून लैगिंक अत्याचार
पळून गेलेल्या 42 वर्षांच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
मुंबई, – घरासमोरच खेळत असलेल्या एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या 42 वर्षीय आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
26 वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपर येथे राहते. तिला सहा वर्षांची मुलगी असून ती नर्सरीमध्ये शिकते. याच परिसरात आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता तिची मुलगी घरासमोरच खेळत होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि मुलीची पॅण्ट काढून तिच्याशी अश्लील चाळे करुन अत्याचार केला होता. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने घाटकोपर पोलिसांना ही माहिती सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी तेथून पळून गेला होता, त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.