पंधरा वर्षांच्या अल्पवयीन बहिणीवर भावाकडूनच अत्याचार
लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच भावास अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन बहिणीचा तिच्याच 19 वर्षांच्या मोठ्या भावाने अश्लील चाळे करुन जबदस्तीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना गोवंडीतील बैंगनवाडीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमातर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी भावाला मंगळवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पिडीत मुलीला देवनार येथील शासकीय मुलीच्या पुर्नवसन केंद्रात ठेवण्यात आले असून तिथेच तिची मेडीकल केली जाणार आहे.
15 वर्षांची पिडीत मुलगी ही गोवंडीतील बैंगनवाडीतील रहिवाशी आहे. सध्या ती देवनारच्या शासकीय मुलीचे पुर्नवसन केंद्रात राहते. याच केंद्रात असताना तिची अधिकारी महिलांनी चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान तिने ती आठवीत असताना 2023 रोजी तिच्या घरी झोपली होती. यावेळी तिचा मोठा भाऊ तिच्या शेजारीच झोपण्यासाठी आला होता. त्याने तिच्या शरीरावरुन, छातीवर आणि प्राव्हेट पार्टवर हात फिरवून तिच्याशी नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने तिच्याशी जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली होती.
मात्र भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर चार ते पाच महिन्याने त्याने पुन्हा तिच्यावर दुसर्यांदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. या घटनेनंतर तिला तिच्या आई-वडिलांनी देवनार येथील शासकीय मुलीचे पुर्नवसन केंद्रात दाखल केले होते. सप्टेंबर 2024 पासून ती तिथे राहण्यासाठी गेली होती. तिथे काही दिवस राहिल्यानंतर ती पुन्हा तिच्या घरी गेली होती. घरी आल्यानंतर चार महिन्यानंतर ती घरात झोपली असता तिचा भाऊ तिच्याजवळ आला होता. त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग आल्याने तिने त्याला बाजूला करुन ओरडून हे काय करतोस असा जाब विचारला होता. त्यानंतर तो तेथून निघून गेला.
भावाकडून होणार्या लैगिंक अत्याचाराला कंटाळून तिने अखेर पुर्नवसन केंद्रातील अधिकारी महिलांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्याकडून ही माहिती प्राप्त होताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या मुलीची सविस्तर जबानी नोंदवून, तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा 19 वर्षांच्या भावाविरुद्ध विनयभंग, लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणार्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.