अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीचा मृत्यू
गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याचा अंदाज
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – फिरायला घेऊन जातो असे सांगून एका चौदा वर्षांच्या मुलीला सुरतहून मुंबईतील एका हॉटेलमध्ये आणून तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लैगिंक अत्याचार करण्यापूर्वी ४१ वर्षांच्या आरोपीने कुठल्या तरी गोळ्याचा अतिरिक्त सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी डी. बी मार्ग पोलिसांनी अपहरणासह लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्याने कुठले गोळ्या घेतले होते याचा उलघडा होणार आहे.
४३ वर्षांची तक्रारदार महिला ही गुजरातच्या सुरतची रहिवाशी असून तिला चौदा वर्षांची एक मुलगी आहे. आरोपी संजयकुमार तिवारी हा तिच्या मुलीच्या परिचित असून ते दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला होते. याच कंपनीत संजयकुमार मॅनेजर म्हणून काम करत होता. तिथेच ओळख झाल्यानंतर तो तिच्या संपर्कात आला होता. मुलीच्या वडिलांना पॅरालिसीसचा आजार असल्याने तो तिला आर्थिक मदत करत होता. अनेकदा तो त्यांच्या घरी जाऊन त्यांना हवी ती मदत करत होता. त्यातून त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. शनिवारी २ नोव्हेंबरला संजयकुमार हा चौदा वर्षांच्या पिडीत मुलीला फिरायला घेऊन जातो असे सांगून सुरतहून मुंबईत आला होता. मुंबईत आल्यानंतर त्याने तिचे बोगस आधारकार्ड सादर करुन ग्रँटरोड येथील एम. एस रोडवरील एका हॉटेलमध्ये बुक केला होता. याच हॉटेलमध्ये राहत असताना त्याने कुठल्या तरी गोळ्या प्राशन केले होते. त्यानंतर त्याने पिडीत मुलगी अल्पवयीन असताना तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. या लैगिंक अत्याचारानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध झाला होता.
ही माहिती मुलीकडून हॉटेलच्या कर्मचार्यांना समजताच त्यांनी संजयकुमारला तातडीने जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती समजताच डी. बी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पिडीत मुलीसह तिच्या आईची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संजयकुमारविरुद्ध अपहरणासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. संजयकुमारचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याने कुठले औषध घेतले होते याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. आरोपीचा मृत्यू झाल्याने याबाबतचा अहवाल लवकरच पोक्सो कोर्टात सादर केला जाणार आहे.