मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२४
मुंबई, – गेल्या आठवड्यात ग्रँटरोड परिसरात सुरु असलेल्या कुंटनखान्यातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर गुरुवारी पुन्हा डी. बी मार्ग पोलिसांनी अशाच अन्य एका कुंटनखान्यात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी कुंटनखान्याच्या चालकास पोलिसांनी अटक केली. सुरेश रामधनी गुप्ता असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रेखा मंडल आणि अर्जात सुरेश गुप्ता या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत पोलिसांनी नऊ महिलांची सुटका करुन त्यांना सुरक्षेकामी चेंबूरच्या नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात डी. बी मार्ग पोलिसांनी एका कुंटखान्यात छापा टाकून एका महिलेस अटक करुन काही महिलांची सुटका केली होती. ही कारवाई सुरु असतानाच पाववाला पथ, सिम्प्लेक्स इमारतीमध्ये अशाच प्रकारे दुसरा कुंटनखाना सुरु आहे. तिथे काही महिलांना डांबून ठेवून त्यांना ग्राहकांसोबत जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरा पोलिसांनी सिम्पलेक्स इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील रुम क्रमांक सहामध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी नऊ महिलांची सुटका केली. या महिलांच्या चौकशीतून तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिथे उपस्थित कुंटणखान्याचा चालक सुरेश गुप्ता याला पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांचे दोन सहकारी अर्जात गुप्ता आणि रेखा मंडल हे दोघेही पळून गेले होते. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सुटका केलेल्या महिलांना नंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.