भारतातील सर्वांत मोठा डिजीटल अरेस्ट घोटाळ्याचा पर्दाफाश
58 कोटीच्या घोटाळ्याशी संबंधित सात आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – डिजीटल अरेस्टच्या नावाने एका वयोवृद्ध जोडप्याला सुमारे 58 कोटीचा गंडा घालणार्या एका टोळीचा महाराष्ट्र राज्य सायबर विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. या घोटाळ्याशी संबंधित सातजणांना वेगवगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. शेख शाहिद अब्दुल सलाम, जाफर अकबर सय्यद, अब्दुल नासीर अब्दुल करीम खुल्ली, अर्जुन फौजीराम कडवासरा, जेठाराम राहिंगा कडवासरा, इम्रान इस्माईल शेख आणि मोहम्मद नावेद शेख अशी या सातजणांची नावे आहेत. या आरोपींकडून साडेतीन कोटीची रक्कम फ्रिज करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर सातही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने डिजीटल अरेस्टच्या भीतीने एका जोडप्याला सुमारे 58 कोटीचा गंडा घातला होता. हा भारतातील आतापर्यंत सर्वांत मोठा डिजीटल अरेस्ट घोटाळा असल्याचे बोलले जाते.
यातील तक्रारदार 72 वर्षांचे वयोवृद्ध असून ते त्यांच्या पत्नीसोबत दक्षिण मुंबईत राहतात. त्यांचा स्वतचा शेअरशी संबंधित व्यवसाय होता. ऑगस्ट महिन्यांत त्यांना सुब्रमण्यम आणि करण शर्मा नावाच्या दोन व्यक्तींनी कॉल केला होता. त्यांनी ते ईडीसह इतर केंद्रीय तपास यंत्रणेशी संबंधित असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून चौकशी सुरु असेपर्यंत ते त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्याच घरात डिजीटल अरेस्ट असल्याचे सांगितले होते.
ही कारवाई सुरु असल्याने त्यांच्या बँक खात्यातील रक्कम त्यांना ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना ती रक्कम परत मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी 40 दिवसांत वेगवेगळ्या बँक खात्यात 58 कोटी 13 लाख 50 हजार रुपये संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते.
हा प्रकार त्यांच्या परिचिताला सांगितल्यानंतर त्यांना त्यांची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. डिजीटल अरेस्टच्या धमकी देऊन भारतातील ही आतापर्यंत मोठ्या डिजीटल अरेस्ट घोटाळा होता. त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश सायबर सेल पोलिसांना दिले होते. या आदेशांनतर या पथकाने संबंधित बँक खात्यासह बँकिंग व्यवहार, केवायसी रेकॉर्ड, अनेक लिंक्ड खात्यांचे स्टेटमेंटची तपासणी सुरु केली होती. त्यात साडेसहा म्युअरल हजार खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले होते.
फसवणुक करणारी ही मोठी सायबर टोळी असल्याचे उघडकीस येताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती, त्या बँक खात्यातील खातेदार शेख शाहिद, जाफर सय्यद, अब्दुल खुल्ली, अर्जुन कडवासरा, जेठाराम कडवासरा, इम्रान शेख आणि मोहम्मद नावदे या सातजणांना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. या आरोपींचा या गुन्ह्यांत थेट सहभाग उघडकीस आला होता.
त्यांच्या बँक खात्यातून ही रक्कम इतर बँक खात्यातून ट्रान्स्फर झाली होती. त्यासाठ सातही खातेदारांना ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. या गुन्ह्यांत पोलिसांनी साडेतीन कोटीची रक्कम फ्रिज केली आहे. या कटातील मुख्य सूत्रधार फरार असून त्यांच्य टकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांत काही बँक अधिकार्यांचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.