अत्याचाराच्या उद्देशाने दहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन हत्या
हत्येनंतर मृतदेह डकमध्ये फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2025
मुंब्रा, – लैगिंक अत्याचाराच्या उद्देशाने एका दहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्रा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आसिफ नावाच्या 20 वर्षांच्या आरोपीस मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अपहरणासह लैगिंक अत्याचार, हत्या, हत्येचा पुरावा नष्ट करणे तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहेत.
सोमवारी 7 एप्रिलला रात्री अकरा वाजता मुंब्रा येथील एका निवासी इमारतीच्या डकमध्ये दहा वर्षांची एक मुलगी संशयास्पद पडल्याचे काही स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच या रहिवाशांनी ही माहिती दिली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच मुंब्रा पोलिसांच्या एका विशेष पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह अग्निमशन दलाच्या जवानांनी धाव घेत तिथे डकमध्ये पडलेल्या मुलीला बाहेर काढले होते. बेशुद्धावस्थेत असलेल्या या मुलीला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तिच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. त्यात तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.
प्राथमिक तपासात अपहरण केलेल्या या मुलीवर लैगिंक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. हत्येचा प्रकार उघड होऊ नये म्हणून मारेकर्याने तिचा मृतदेह डकमध्ये फेंकून हत्येचा पुरावा नष्ट केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी इमारतीमधील काही स्थानिक रहिवाशांची जबानी नोंदवून चौकशी सुरु केली होती. यावेळी याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणार्या आसिफ या 20 वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत आसिफ हा मूळचा बिहारच्या सुल्तानपूर, अमरपूर, बाकाचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्याने लैगिंक अत्याचाराच्या उद्देशाने या मुलीचे अपहरण केले होते. तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन त्याने तिची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह डकमध्ये फेंकून तेथून पलायन केले होते. तपासात हा प्रकार आसिफविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह लैगिंक अत्याचार करुन हत्या करणे, हत्येचा पुरावा नष्ट करणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. आसिफच्या अटकेने हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.