मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देऊन लैगिंक अत्याचार
सोळा वर्षांच्या मुलीच्या तक्रारीवरुन मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ डिसेंबर २०२४
मुंबई, – मैत्री करुन मैत्रिणीचे मॉर्फ फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्रानेच तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी निरज नावाच्या एका २० वर्षांच्या मित्राविरुद्ध मालवणी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. निरज हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पिडीत मुलगी ही कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात राहत असून निरज हा तिच्या परिचित आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्याने तिच्याशी मैत्री केली होती. या दरम्यान त्याने तिचे काही फोटो घेतले होते. ते फोटो मॉर्फ करुन त्याने तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी दिली होती. तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. बदनामीच्या भीतीने ती त्याच्यासोबत मालाडच्या मालवणीतील एका लॉजमध्ये गेली होती. तिथे गेल्यानंतर त्याने तिला गुंगीचे औषध दिले होते. या लॉजसह नालासोपारा येथील फ्लॅटमध्ये त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्याच्याशी लग्न कर नाहीतर तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची तो तिला सतत धमकी देत होता. त्याच्या ब्लॅकमेलसह धमकीला कंटाळून तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला होता. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यांनी निरजविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या मुलीने त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी मित्राविरुदध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मालाडच्या हद्दीत घडल्याने गुन्ह्यांचा तपास नंतर मालवणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी निरजचा शोध सुरु केला होता, मात्र तो त्याच्या घरातून पळून गेल्याचे पोलिसांना समजले. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौदा वर्षांच्या मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीस अटक
अन्य एका घटनेत चौदा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे तिच्यावर लैगिंक अत्याचार केलयाप्रकरणी निकेतन नावाच्या ३७ वर्षांच्या आरोपीस वाकोला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलगी ही तिच्या पालकांसोबत सांताक्रुज परिसरात राहते. गेल्या ऑगस्ट महिन्यानंतर निकेतन हा पिडीत मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. पैशांचे आमिष दाखवून तर भीती घालून तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग करत होता. अनेकदा तो तिच्याशी शरीराला अश्लील स्पर्श करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ या कालावधीत त्याने तिच्याशी दोन ते तीन वेळा लैगिंक अत्याचार केला होता. त्यामुळे या मुलीने ही माहिती तिच्या आईला सांगितली होती. या माहितीनंतर तिने निकेतनविरुद्ध वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच बुधवारी निकेतनला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.