तीन वर्षांच्या मुलीवर अश्लील चाळे करुन अत्याचार
कुर्ल्यातील घटना; ३५ वर्षांच्या आरोपीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – घरासमोर खेळत असलेल्या एका तीन वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरी आणून तिच्यावर अश्लील चाळे करुन अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेजारीच राहणार्या ३५ वर्षांच्या आरोपीविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
३३ वर्षांची तक्रारदार महिला ही कुर्ला परिसरात राहत असून पिडीत तिची तीन वर्षांची मुलगी आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता ती तिच्या घरासमोरच खेळत होती. यावेळी तिच्या शेजारी राहणार्या आरोपीने तिला त्याच्या घरी घेऊन आला. तिच्याशी अश्लील चाळे करुन त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने तिला घरी पाठवून दिले. घरी आल्यानंतर तिला वेदना होऊ लागले. त्यामुळे तिच्या आईने तिची विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्याकडून मिळालेल्या माहितीने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने विनोबा भावे नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी ६४, ६५ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.