मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायल करुन पत्नीची बदनामी करुन पतीकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अनिसुद्दीन नावाच्या एका आरोपीस वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह खंडणी आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
२७ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत वडाळा परिसरात राहते. जूनच्या दुसर्या आठवड्यात तिचे काही अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. ते फोटो व्हायरल केल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने तिच्या पतीकडे पन्नास हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर तिचे आणखीन फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीच त्याने दिली होती. तसेच त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर या दोघांनी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विनयभंगासह खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अनिसुद्दीन नावाच्या एका आरोपीस संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. महिलेचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्याने तिच्या पतीला खंडणीसाठी धमकी दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.