विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

शुक्रवारी पोलीस आयुक्तांनी जारी केले पंधरा उपायुक्तांच्या बदलीचे आदेश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्य पोलीस दलात बदल्याचे सत्र सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई शहरातील पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या पंधरा पोलीस अधिकार्‍यांच्या शुक्रवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. शुक्रवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पंधरा पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहे. या अधिकार्‍यांना तातडीने त्यांच्या नव्याने नियुक्त केलेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देताना पोलीस महासंचालक कार्यालयात तशी माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यापासून इतर सर्व पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याचे सत्र सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांत काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबई शहरात कार्यरत असलेल्या पंधरा पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहे. या सर्व अधिकार्‍यांना त्यांच्या नव्याने नियुक्त झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात मुख्यालय दोनचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यासंची परिमंडळ सहा, कालिना सशस्त्र विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांची पोलीस मुख्यालय दोन, अंमलबजावणी विभागाच्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांची परिमंडळ चार, परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष कृती दल, परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष शाखा एक, पोलीस मुख्यालय एकचे पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांची संरक्षण विभाग, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची पोलीस मुख्यालय एक, विशेष शाखा एकचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांची परिमंडळ तीन, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची गुन्हे शाखा अंमलबजावणी, पूर्व उपपगरे वाहतूक विभागचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण याची पूर्व उपनगरे वाहतूक विभाग, संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकांत मंगेश सागर यांची परिमंडळ सात, सुरक्षा विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांची सुरक्षा विभाग, नागपूरचे पोलीस उपायुक्त निमित्त गोयल यांची कालिना येथील सशस्त्र पोलीस विभाग, ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर बी पाठारे आणि सचिन गुंजाळ यांची अनुक्रमे बंदर परिमंडळ विभाग व परिमंडळ दहाच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page