नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज

अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ डिसेंबर २०२४
मुंबई, – सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागतासाठी एकीकडे मुंबईकरांनी जय्यत तयारी केली असताना शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या मदतीला वाहतूक पोलीस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, बीडीडीएस विशेष पथक, राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांची तयारी पूर्ण झाली असून सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनासाठी आठ अतिरिक्त आयुक्त, २९ पोलीस उपायुक्त, ५३ सहाय्यक पोलीस आयुक्त, २१८४ पोलीस अधिकारी, १२ हजार ०४८ पोलीस कर्मचारी आदींना बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलासह क्यूआरटी, आरसीपी, होमगार्ड जवानांना तैनात करण्यात आले आहे. बंदोबस्तात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा आदेशच पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आला आहे.

मुंबई शहरात बॉम्बस्फोटाच्या निनावी कॉल, संभाव्य हल्ल्याचा धोका शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती दखल घेतली आहे. नवीन वर्षांचे आगमन भयरहित, शांततामय परिस्थितीत करता यावे म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहे. शहरातील विविध रेल्वे स्थानके, शासकीय-निमशासकीय इमारती, मंदिर, गर्दीच्या ठिकाणी विशेषता गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ, गोराई चौपाटी, पवई तलाव आणि इतर धार्मिक ठिकाणी तसेच राजकीय नेत्यांचे पुतळे, मॉल, गर्दीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी सीसीटिव्हीद्वारे निगराणी ठेवण्यात आली आहे. समुद्रकिनारी लाखोच्या संख्येने मुंबईकर नवीन वर्षांच्या स्वागतासाठी येत असल्याने तिथे जास्तीत जास्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथक यांच्याकडून घातपात विरोधी तपासणी तसेच समुद्रकिनारी बोटीच्या सहाय्याने सतर्क गस्त घालण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या ठिकाणी विशेष नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन तसेच शहरातील हॉटेल, लॉज आणि गॅरेजची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. मद्यप्राशन करुन होणारे वाद, महिलांची छेडछाड तसेच विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला छेडछाड विरोधी पथकाची केली आहे. मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, रॅश ड्रायव्हिंग करणे अशा घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तळीरामांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. त्यासाठी जागोजागाी नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईकरांनी पोलिसांना सहकार्य करावे, शक्ततो पोलिसांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नये अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.

नवीन वर्षांत पार्टी करण्यासाठी अवैध दारुची तस्करी रोखण्यासाठी तसेच हॉटेलमधील पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्काची करडी नजर असणार आहे. हॉटेलच्या टेरेसवर मोठ्या प्रमाणात पार्ट्याचे आयोजन होते, विनापरवानगी अशा पार्ट्यांना मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षांत मोठ्या प्रमाणात बनावट मद्य आणि अवैध दारुची तस्करी होते, त्यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मढ, मार्वे, गोरेगाव येथील संजय गांधी उद्यान, दहिसर परिसरात मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस पार्ट्या चालत असल्याने तिथे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

मुंंबईकरांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावा यासाठी मुर्ंब पोलिसांसह वाहतूक पोलिसांचे आठ अतिरिक्त पोलीस आयुक्त, २९ पोलीस उपायुक्त, ५३ सहाय्यक पोलीस अधिकारी आणि २१८४ पोलीस अधिकारी आणि १२०४८ पोीस अंमलदारांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यत आले आहे. मुंबई पोलिसांसोबत सशस्त्र दलासह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस विविध ठिकाणी बंदोबस्ताकामी ठेवण्यात आले आहे. तसेच नवीन वर्षांत विविध ठिकाणी कार्यक्रम करणार्‍या आयोजकांनाही योग्य त्या सूचना देणयात आल्या आहेत.

प्रतिवर्षाप्रमाणे वाहतूक पोलिसांनी ड्रक ऍण्ड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबईकरांना कुठल्याही प्रकारे समस्या असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांच्या १०० क्रमंकावर कंट्रोल रुमशी संपर्क साधावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page