अज्ञात सायबर ठगांचा पोलिसांकडून शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – बँक खात्याचे आणि आधारकार्डचा तपशील न दिल्याने ठगाने चॅलेंज देऊन व्यापाऱ्याच्या खात्यातून ६ लाख रुपये काढल्याची घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
तक्रारदार हे किराणा मालाचे व्यापारी असून ते विलेपार्ले परिसरात राहतात. त्याचे एका खासगी बँकेत खाते आहे. १६ जानेवारीला त्याना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या ने तो खासगी बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तक्रारदार याना बोलण्यात गुंतवून आधारकार्ड आणि आयएफसी कोड मागितला. तेव्हा तक्रारारदार याने आधारकार्ड चा नंबर आणि आयएफसी कोड देण्यास त्याने नकार दिला. नकार दिल्यानंतर काही वेळाने तक्रारदार याना व्हाट्स अप वर एक लिंक आली. त्या लिंकवर त्याने क्लिक केले. त्यानंतर काही तरी डाऊन लोड झाले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदार याने बँकेत जाऊन त्या नंबर बाबत चौकशी केली.
बँक कर्मचाऱ्याने देखील तो नंबर सायबर ठगांचा असू शकतो असे त्याना सांगितले.. त्या घटनेनंतर त्याने तो नंबर आणि मोबाईलवर आलेली लिंक डिलीट केली. दोन दिवसापूर्वी तक्रारदार याच्या मोबाईलवर एक ओटीपी आला. त्याच्या खात्यातून पैसे गेल्याचे त्याना मेसेज आले. काही वेळाने त्याना एका नंबरवरून फोन आला. ठगाने तक्रारदार याना चॅलेंज दिले, त्या दिवशी माहिती दिली नाही त्यामुळे तुमचे पैसे काढून घेतले असे सांगून त्याने फोन ठेवला. ठगाने त्याच्या खात्यातून सहा लाख रुपये काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.