ईमेल हॅक करुन ऑनलाईन शॉपिंग करुन सहा लाखांची फसवणुक

महिलेच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मे 2025
मुंबई, – ईमेल हॅक करुन ऑनलाइ्रन शॉपिंग करुन एका महिलेच्या क्रेडिट कार्डचा अज्ञात सायबर ठगाने गैरवापर करुन सुमारे सहा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध मालाड पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

माधुरी विजय रसाळ ही महिला मालाड येथे राहत असून गोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिच्याकडे विविध चार बँकेचे क्रेडिट कार्ड असून या कार्डवर तिच्या मेल व मोबाईलवर लिंक केले आहे. 21 जुलै 2024 रोजी ती तिच्या घरी होती. यावेळी तिच्या क्रेडिट कार्डवरुन 50 हजार 900 रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाल्याचा तिला मॅसेज आला होता. त्यानंतर तिला पुन्हा तिच्या कार्डवरुन वेगवेगळे सहा ऑनलाईन व्यवहार झाल्याचा मॅसेज प्राप्त झाला होता. या सातही ऑनलाईन व्यवहारातून अज्ञात सायबर ठगाने सहा लाख सोळा हजार रुपयांची ऑनलाईन शॉपिंग केली होती.

हा प्रकार लक्षात येताच तिने मालाड पोलिसांत तक्रार केली होती. तिने कोणालाही तिच्या क्रेडिट कार्डची माहिती, ओटीपी शेअर केली नव्हती. तिला कोणाचेही कॉल किंवा लिंक आली नव्हती. तरीही तिच्या तीन बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन संंबंधित सात ऑनलाईन व्यवहार झाले होते. तपासात अज्ञात सायबर ठगाने तिचा ईमेल हॅक करुन तिच्या क्रेडिट कार्डची माहिती प्राप्त करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस मालाड पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्या शॉपिंग पोर्टलवरुन संबंधित ऑनलाईन शॉपिंग झाली होती, त्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page