मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस ना. म जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. अब्दुल सदावत खान असे या आरोपीचे नाव असून त्याच्यासह त्याच्या इतर सहकार्यांनी भाड्याने कार घेण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पावणेपाच लाख रुपयांचे विविध कंपनीचे मोबाईल जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडीत सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर सात आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष शोधमोहीम सुरु केली आहे.
जानेवारी २०२४ रोजी यातील तक्रारदार तरुणाने भाड्याने कारसाठी गुगलवर एका ट्रॅव्हेल्स कंपनीचा मोबाईल सर्च केला होता. यावेळी त्याला एक मोबाईल क्रमांक सापडला होता. या मोबाईलवरुन संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून दिली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर या व्यक्तीने त्याच्या बँक खात्यातील माहिती काढून त्याच्या खात्यातून सुमारे पावणेदोन लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. पैसे डेबीट झाल्यासचा मॅसेज आल्यानंतर त्यांना फसवणुकीच्या हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर त्याने ना. म. जोशी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांी तांत्रिक माहितीवरुन अब्दुलला सांताक्रुज येथून ताबयात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याला या गुन्ह्यांत इतर सात आरोपींनी मदत केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे सहा मोबाईल जप्त केले असून त्याची किंमत पावणेपाच लाख रुपये आहे.