पोक्सोच्या गुन्ह्यांतील 27 वर्षांच्या आरोपीला वीस वर्षांचा कारावास
अल्पवयीन मुलीवरील अपहरणासह लैगिंक अत्याचाराचा आरोप सिद्ध
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पोक्सोच्या गुन्ह्यांतील फरहान साकिब खान नावाच्या एका 27 वर्षांच्या आरोपी तरुणाला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने दोषी ठरवून वेगवेगळ्या कलमांतर्गत वीस वर्षांच्या कारावसासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची एक हजाराची रक्कम न भरल्यास त्याला अतिरिक्त एक महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा त्याच्यावर असलेला आरोप सिद्ध करण्यात एमएचबी पोलिसांना यश आले आहे. या खटल्यात पोलिसांनी सादर केलेले पुरावे, साक्षीदारांची जबानी आदींमुळे त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सहा वर्षांपूर्वी उत्तर मुंबईतील दहिसर परिसरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस येताच एमएचबी पोलिसांनी फरहान खान या आरोपीविरुद्ध एमएचबी पोलिसांनी अपहरणासह लैगिंक अत्याचार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध विशेष पोक्सो कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची नियमित सुनावणी कोर्ट क्रमांक तेराच्या न्या. एस. एन सचदेव यांच्या कोर्टात सुरु होती.
अलीकडेच या खटल्याची पूर्ण झाली होती. पोलिसांनी सादर केलेले पुरावे, पिडीत मुलीसह इतर साक्षीदारांची जबानी आणि अन्य पुराव्याच्या आधारे कोर्टाने फरहानला दोषी ठरविले होते. शुक्रवारी 31 ऑक्टोंबर 2025 रोजी. न्या. सचदेव यांनी फरहानला अहपरणाचाच्या कलामंतर्गत तीन वर्षांच्या सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अधिक कारावास, लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत दहा वर्षांचा सश्रम कारावास व एक हजाराचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन एक महिना कारावास आणि जिवे दिल्याच्या गुन्ह्यांत एक वर्ष कारावास तसेच पोक्सोच्या दोन वेगवेगळ्या कलमांतर्गत वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
एकूण त्याला वेगवेगळ्या कलमांतर्गत वीस वर्षांच्या कारावासासह एक हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून देवतरसे सर, चव्हाण, जाधव मॅडम यांनी काम पाहिले तसेच तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त धनवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश गवळी, पोलीस निरीक्षक अतुल आव्हा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार सातपुते यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.