मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जून २०२४
मुंबई, – पोटाचा आजारामुळे गेल्या काही दिवसांपासून रजेवर असलेल्या शाहूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विजय सर्जेराव साळुंखे (३८) यांनी गुरुवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विजय साळुंखे यांच्याकडे पोलिसांकडे एक सुसायट नोट सापडली असून त्यात त्यांनी त्यांच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. या आत्महत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वडाळा टी टी पोलिसांना तपासाचे आदेश देताना दोषीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ही घटना शुक्रवारी साडेआठ वाजता सायन येथील प्रतिक्षानगर पोलीस वसाहतीत उघडकीस आली. याच वसाहतीच्या ए विंग चौथा मजल्यावरील रुम क्रमांक ४०८ मध्ये विजय साळुंखे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. शाहूनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या विजय यांना पोटाचा आजार होता. त्यामुळे ते ३० मेपासून रजेवर होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते, मात्र त्यातून त्यांना काहीच फरक जाणवत नव्हता. त्यात त्यांचे पत्नीसोबत वाद सुरु होता. त्यातून त्यांना प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्यांनी त्यांच्या राहत्या घरातील भिंतीच्या कडीला नॉयलॉयच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी ही वडाळा टी टी पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. विजय साळुंखे यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या शरीरावरील कपड्यांची तपासणी केल असता पॅण्टच्या पॉकेटमध्ये पोलिसांना एक सुसायट नोट सापडली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या पत्नीच जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. ही सुसायट नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी एडीआरची नोंद करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. त्यांच्या पत्नीची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान विजय साळुंखे यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे.