राज्य पोलीस दलातील वीस पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
पाच उपायुक्तासह पंधरा सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – राज्य पोलीस दलातील २० पोलीस अधिकार्यांच्या बुधवारी गृहविभागाने बदल्या केल्या असून त्यात पाच पोलीस उपायुक्त तर पंधरा सहाय्यक पोलीस आयुक्त-पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. बदल्या झालेल्या पोलीस अधिकार्यांनी तातडीने त्यांच्या नव्या नियुक्त झालेल्या विभागाची जबाबदारी सांभाळण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी बुधवारी राज्य पोलीस दलातील पाच पोलीस उपायुक्तासह वीस पोलीस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक गोपाळराव पाटील यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचया पोलीस अधिक्षक, पुण्याचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची ठाणे पोलीस उपायुक्त, ठाण्याचे उपायुक्त गणेश गावडे, नवनाथ ढवळे यांची मुंबई शहर, नाशिक महाराष्ट्र अकादमीचे पोलीस अधिक्षक सचिन पांडुरंग गोरे यांची ठाण्याच्या पोलीस उपायुक्त, सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजू धोंडीराम मोरे यांची पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मसुदखान महेबुबखान यांची बुलढाणा पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ रामराव ठोंबरे यांची पुणे शहर, ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर रामदास खैरनार, अनिल वसंतराव देशमुख यांची मुंबई शहर, पुणे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुंवर यांची अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचया पोलीस उपअधिक्षक, पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल खंडुजी कुबडे यांची सोलापूर तर विवेक वसंतराव मुगळीकर यांची रायगडच्या श्रीवर्धन, उपविभागीय अधिकारी, नागपूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयेश मुरलीधर भांडाकर यांची वर्धा मुख्यालय, अमरावतीच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम संभाजी पाटील यांची अकोला, पोलीस प्रशिक्षण केंद्राचया पोलीस उपअधिक्षक, अहमदनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक संदीप बाबूराव मिटके यांची नाशिक शहर, चंदूपरच्या मूल विभागाचे उपविभागीय अधिकारी साहिल उमाकांत झरकर यांची गोंदिया तिरोडा उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड मुख्यालयाचे पोलीस उपअधिक्षक संतोष शिवाजी वाळके यांची अकोला लोहमार्ग उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीणचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक पुंडलिक नामदेवराव भटकर यांची वर्धा आर्थिक गुन्हे शाखेत, गोंदियाच्या तिरोडा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मायाराम मडामे यांची गोंदियाच्या आमगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.