राज्य पोलीस दलातील २५ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
बदल्यांमध्ये सतरा पोलीस उपायुक्तासह आठ एसीपींचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२४
मुंबई, – राज्य पोलीस दलातील पंचवीस पोलीस अधिकार्यांच्या गुरुवारी गृहविभागाच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात सतरा पोलीस उपायुक्त-पोलीस अधिक्षकांसह आठ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. मुंबईच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुण्याला तर राजतिलक रोशन यांची कायदा व सुव्यवस्थेच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री उशिरा गृहविभागचे सह सचिव व्यकंटेश भट आणि अवर सचिव संदीप ढाकणे यांनी संबंधित पोलीस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते. या बदल्यामध्ये पुण्याचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांची पुणे ग्रामीण, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची मुंबई, मुंबईच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे, राजतिलक रोशन यांची कायदा व सुव्यवस्थेच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, नागपूरचे पोलीस उपायुक्त निमित गोयल यांची मुंबई, सोलापूरचे समादेशक विजय चव्हाण यांची सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची पुणे लोहमार्ग पोलीस अधिक्षक, नागपूरचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या सायबर सेल, भंडार्याचे पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांची नागपूर, ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची मुंबई, सुशांत सिंह यांची अमरावती समादेशक, देशमुख अभयसिंह बाळासाहेब यांची पुणे पोलीस अधिक्षक, गोकुळ राज बी यांची नवी मुंबई राज्य राखीव बलाच्या समादेशक, कांबळे आशित नामदेव यांची नंदूरबार येथील अप्पर पोलीस अधिक्षक, महक स्वामी व निथीपुडी रश्मिता राव यांची नागपूर, पंकज अतुलकर यांची सोलापूर राज्य राखीव बलाच्या समादेशक, सिंगा रेड्डी हृषिकेश रेड्डी यांची गडचिरोली अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
अन्य पोलीस अधिकार्यांमध्ये दिपक अग्रवाल यांची नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, दुगड दर्शन प्रकाशचंद्र यांची नंदूरबारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, हर्षवर्धन बी. जे यांची यवतमाळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, जीवन देवाशिष बेनीवाल यांची परभणी उपविभागीय पोलीस अधिकारी, नवदीप अग्रवाल यांची वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, शुभमकुमार यांची अमरावती उपविभागीय पोलीस अधिकारी, विमला एम यांची सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वृष्टी जैन यांची नागपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.