मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मार्च २०२४
मुंबई, – शिवसेनेचे धडाडीचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने मागाठाणे येथे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उत्तर मुंबईचे शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महायुतीचे लोकसभेचे उमेदवार पियुष गोयल यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून आमदार प्रकाश सुर्वे यांचे कौतुक केले.
आपले भाग्य महणून आपल्या भूमीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे जाणते राजे लाभले, त्यांचे कर्तृत्व भावी पिढीला कळवा या उद्देशाने स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी कार्यक्रमांला हजेरी लावून स्थानिक लोकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी प्रचंड जनसमुदायासमोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कामाचे कौतुक केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची जबाबदारी आल्यानंतर मराठमोळ्या सण-उत्साहासह अन्य धार्मियांचे सण आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून साजरे केले जात आहे. राज्यात सर्वधर्म समभाव हे क्षण खर्या अर्थाने अनुभवयाला मिळत आहेत. यावेळी आमदार प्रविण दरेकर, प्रकाश सुर्वे यांच्यासह महिला विभागप्रमुख शिलाताई गांगुर्डे, विधानसभा संघटक मनिषा सावंत, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी, सुषमा गायकवाड, वैष्णवी प्रकाश पुजारी, मुंबई समन्वयक आशिष नायर, कार्यालयप्रमुख वसंत पाटील, सुरंजन सिंग, विक्रम चौधरी, भीमराव नलावडे व सर्व उपशाखाप्रमुखासह गटप्रमुख आणि युवा शाखा अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार प्रकाश सुर्वे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषता स्थानिक नागरिकांचे आभार व्यक्त केले होते.