आमीर खाननंतर रणवीर सिंहचा डिपफेक व्हिडीओ व्हायरल
वडिलांच्या तक्रारीवरुन नोडल सायबर सेलकडून गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता आमीर खान याच्यानंतर अभिनेता रणवीर सिंह याचा डिपफेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यात रणवीर सिंह हा एका राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या व्हिडीओशी रणवीरचा काहीही संबंध नसून त्याने कधीही कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केला नाही असे खुलासा करत त्याच्या वडिलांनी नोडल सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सायबर सेल ऍक्शन मोडवर आले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
रणवीर सिंह हा सिनेअभिनेता असून १४ एप्रिलला तो भारतीय फॅशनला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेत्री क्रिती सेनन याच्यासोबत उत्तरप्रदेशच्या वाराणसी शहरात गेला होता. यावेळी रणवीरची एशियन न्यूज इंटरनॅशनलद्वारे मुलाखत घेण्यात आली होती. त्यात त्याने पवित्र वाराणसीमध्ये झालेल्या परिवर्तबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. मोदीजी का परपज यही था उनका उद्देश यही था की, वो सेलिब्रेट करे आपने रिच कल्चर, हेरिटेज को, हमारी हिस्ट्री को, हमारी लेंगसी को, क्युकी हेम जो भारतवर्ष है, अब मॉडर्निटी की तरह एैसे बड रहे है, इतनी स्पीड से बढ रहे है, पर हमे हमारी रुटस, हमारी कल्चर हेरीटेज ऐ कभी नही भुलना चाहिए असे कथन केले होते. या व्हिडीओमधील चलचित्र जसेच्या तसे ठेवून आर्टिफियल इंटेलिजन्स, डेटा स्वॅपिंग, मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेजिनन्स बेस स्पिच ओव्हर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रणवीर सिंह यांच्या व्हिडीओचा डिप फेक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. त्यात मोदीजी का परपज यही है, उनक उद्देश यही था की, वो सेलिब्रेट करे हमारी दुखी हुई जीवन, और डर को, हमारी बेरोजगारी को, हमारी मंहगाई को, क्युकी हम जो भारतवर्ष है, अब अन्यायकाल की तरफ एैसे बढ रहे है, इतकी स्पीड से बढ रहे , पर हमे हमारी विकास, हमारी न्याय को मांगना कभी नही भुलना चाहिये, इसलिए सोचो और मत दो जिन्हे देश की फ्रिक है वो न्याय के लिए वोट देगा व्होट फॉर न्याय, व्होट फॉर कॉग्रेस असे बोलत असलेला डिपफेक व्हिडीओ बनवून तो १७ एप्रिल रात्री साडेनऊ वाजता सोशल मिडीयाच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन व्हायरल केला होता.
या व्हिडीओच्या माध्यमातून रणवीर सिंग हा एका राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. अज्ञात व्यक्तीने त्याच्या नावाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. रणवीर सिंग हा कुठल्याही पक्षाशी संबंधित नसून त्याने कधीच कुठल्या राजकीय पक्षाचा प्रचार केला नव्हता. त्यामुळे सोशल मिडीयावर हा डिपफेक व्हिडीओ व्हायरल करुन अज्ञात व्यक्तीने त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांच्या लौकीकास बाधा निर्माण करुन ठकवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच अज्ञात व्यक्तीविरुद्ध त्याचे वडिल जुगजीतसिंह सुंदरसिंह भावनानी यांनी नोडल सायबल सेल पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ४१७, ४६८, ४६९, ४७१ भादवीसह ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.