सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन व इतर सुविधा सुपूर्द

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
छत्रपती संभाजीनगर – सेवानिवृत्तीच्या दिवशीच तीन पोलिस उपनिरीक्षकांना पेन्शन व इतर अनुज्ञेय लाभ पोलिस अधिक्षक डाॅ.विनयकुमार राठोड यांनी मिळवून दिल्यामुळे सेवानिवृत्त अधिकार्‍यांचे डोळे पाणावले.

आज दिनांक ३१जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत असलेले आबा गोपाळ बोराडे, (35 वर्षे सेवा, संदिपान भानुदास भेरे, (35 वर्षे सेवा), छोटुलाल बाबुलाल बुंदेलखंड(36 वर्षे सेवा)या तीनही पोलिसउपनिरीक्षकांचा सपत्नीक कुटूंबासह पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधीक्षकांनी सेवानिवृत्त होत असलेले पोलीस अधिकारी यांचा स्मृतीचिन्ह व भेटवस्तु देवुन सहकुटूंब त्यांचा सत्कार करून गौरव केला. यावेळी डाॅ.राठोड यांनी मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधी पर्यंत बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करुन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांना पोलीस सेवे दरम्यान कुटूंबाला पाहिजे तसा वेळ दिला गेला नाही आणि डयुटीच्या अनिश्चित वेळेमुळे स्वत:चे प्रकृतीकडे सुध्दा लक्ष देणे शक्य होत नसल्याने त्यांना सेवानिवृत्ती नंतर सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करून स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष देणे बाबत भावना व्यक्त केली. तसेच ते जरी आज पोलीस दलातुन सेवानिवृत्त होत असले तरी यापुढे सुध्दा सदैव पोलीसदल हे त्यांच्या सोबतच राहील असे आश्वासन देवुन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच सेवानिवृत्ती नंतर कोणालाही सेवा लाभ मिळविण्यासाठी कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची वेळ निर्माण होणार नाही, याकरिता प्राधान्याने सर्वांना पेन्शन व इतर सेवा निवृत्ती नंतर अनुज्ञेय लाभ हे सेवानिवृत्त होत असलेल्या दिवशीच पोलीस अधीक्षक यांचे निर्देशानुसार तत्परतेने वितरीत करण्यात आले आहे. सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ मिळाल्याने सेवानिवृत्त अधिकारी यांनी समाधान व आनंद व्यक्त करून पोलीस अधीक्षक यांचे आभार मानले आहे.
तसेच याप्रसंगी सेवानिवृत्त होणारे अधिकारी यांचे पाल्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आपल्या वडिलांचे प्रती व त्यांनी समाजाकरिता बजावलेल्या पोलीस सेवेकरिता आदर व कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी ऋषीकेश संदीपान भेरे यांनी वडिल पोलीस सेवेत असतांना त्याचा वाढदिवस हा गणेशोत्सव कालवधीत येत असल्याने त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला वडिल हे बंदोबस्ताला असायचे त्यामुळे वडिलाशिवाय वाढदिवस साजरा करावा लागत असे सांगतांना भावुक झाले होते. तसेच प्रत्येक सण- उत्सवाचे वेळी वडिलांची वाट बघण्यात बराच कालावधी जात होता परंतु आता वडिलासोबत यापुढे राहता येईल त्यामुळे प्रत्येक सणाचा आनंद द्विगुणीत होईल असे मत व्यक्त केले आहे.
सेवानिवृत्ती कार्यक्रम अनुषंगाने महादेव गोमारे, पोलीस उप अधीक्षक सचिन पंडीत, स.पो.नि. पोलीस अंमलदार ,हबीब शेख, प्रविण पंडित, आशा बांगर, यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page