शेअरमार्केटमध्ये अवैध ट्रेडिंग करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

शेअर ब्रोकरसह तिघांना कांदिवली गुन्हे शाखेकडून अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – कुठलाही अधिकृत परवाना नसताना नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि एमसीएक्स या स्टॉक एक्सचेंजवर अवैधरीत्या शेअर ट्रेडिंग करणार्‍या एका टोळीचा कांदिवली गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका शेअर ब्रोकरसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. विरल प्रविण पारेख, सोहनलाल बनवारीलाल कुमावत आणि जिगर प्रकाश संघवी अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनी अवैध शेअर ट्रेडिंगद्वारे शासनाची सुमारे आठ लाखांची फसवणुक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक सॅमसंग कंपनीचा मॉनिटर की बोर्ड, माऊससह, एक सीपीयु, काऊंटर मशिन, डेल कंपनीचा की मॉनिटर बोर्डसह, एक वही, तीन मोबाईल, 43 हजार 900 रुपयांची कॅश आणि जिओ राऊटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कांदिवलीतील सुभाष लेन, भगत कॉलनीच्या द्वारकेश सहकारी सोसायटीच्या रुम क्रमांक चारमध्ये काहीजण सेबीमार्फत कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि एमसीएक्स या स्टॉक एक्सचेंजवर अवैधरीत्या ट्रेडिंग करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी घटनास्थळी पोलिसांना विरल पारेख हा सापडला. विरल हा शेअर ब्रोकर असून तो सध्या कांदिवलीतील भगत कॉलनीसमोरील इराणीवाडी रोड क्रमांक तीनच्या कैलास हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहतो. घटनास्थळावर असलेल्या मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याची पाहणी केली असता विरल हा एका वेबसाईटवरुन शेअरमार्केट ट्रेडिंग करत असल्याचे दिसून आले. एका संगणकावर ट्रेडिंग करणार्‍या जिगर संघवीला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. तो कांदिवलीतील डहाणूकरवाडी, लॉगिन इमारतीमध्ये राहतो.

तपासात जिगर हा विरल पारेख याच्या सांगण्यावरुन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे सांगितले. तपासात विरलला त्याचा मित्र जॅक ऊर्फ राजू याने संबंधित वेबसाईटचे सबस्क्रिप्शन दिले होते. तो एका ग्रुपचा अ‍ॅडमीन असून त्याने विरलला सब ब्रोकर बनविले होते. त्याच्या नावाने युझर नेम आणि पासवर्ड तयार केले होते. त्यानंतर सोहनलाल कुमावत आणि जिगर संघवी हे संबंधित वेबसाईटच्या माध्यमातून अवैधरीत्या शेअरमध्ये ट्रेडिंग करत होते. त्यांच्याकडे 22 क्लाईंट होते. त्यांनी विरलच्या माध्यमातून शेअरमध्ये ट्रेडिंग केली होती. त्याच्या लॅपटॉपमध्ये संबंधित 22 क्लाईंटची ावेदिसून आले.

दर आठवड्याला ते सर्वजण विरलला शेअर ट्रेडिंगसाठी पैसे आणून देत होते. या ट्रेडिंगवर विरल जॅकला काही रक्कम कमिशन म्हणून देत होता. विरलकडे एनएसई, बीएसईचे शेअर ट्रेडिंगसाठी लायसन्स घेतले आहे का याबाबत विचारणा केल्यानंतर त्याच्याकडे अशा प्रकारे कुठलेही लासन्स नव्हते. त्याने स्वतचा ट्रेडिंग एक्सचेंज चालवून शासनाला जीएसटी, एसएसटी, स्टॉम्प ड्युटी आदी न भरता शासनाची फसवणुक केल्याचे उघडकीस आले.

विरलच्या संगणकासह लॅपटॉपची पाहणी केल्यानंतर संबंधित वेबसाईटवर 30 जून ते 6 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत स्टॉक एक्सचेंज बाहेरील शेअर खरेदी-विक्रीचा टर्नओव्हर 615 कोटीवर आढळून आला. त्यासाठी त्यांनी शासनाच्या सिक्युरिटी ट्रान्झेक्शन टॅक्स, स्टेट गव्हर्नमेंट स्टॅम्प ड्युटी टॅक्स, सेबी टर्नओव्हर फी, एक्सचेंज ट्रेडिंग रेव्हेन्यू असे 8 लाख 5 हजार 985 रुपयांचा महसूल बुडविल्याचे दिसून आले.

हा प्रकार उघडकीस येताच एनएससीचे अधिकारी वैभव प्रकाश पर्वत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबधित तिघांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या तिघांनाही सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page