पोलिसांनी पकडून आणले …नोटीस बजावून सोडून दिले

बनावट पॉवर ऑफ अटर्नीटीद्वारे जमीन विक्री करून २.१३ कोटीचा गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२४
ठाणे, – बोगस पॉवर ऑफ ऍटनीच्या माध्यमातून स्टेशनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी भिवंडीतील जागा देण्याची बतावी करुन एका व्यावसायिकाची पाचजणांच्या टोळीने २ कोटी १३ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन शांतीनगर पोलिसांनी पाचजणांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र आरोपींवर कुठलीही कारवाई न करता त्यांना नोटीस देऊन सोडून दिले. त्यामुळे तक्रारदार व्यावसायिक लवकरच ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संंबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. अटक झालेल्या आरोपी पैकी एका आरोपीचा अटक[पूर्व जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणी वपोनि यांच्याशी संपर्क झाला. मात्र प्रकरणाच्या तपास अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

फिर्यादी रा. आक्रोली सुर्यकिरण कॉ.सहकारी हौ. . सोसायटी, बी विंग 201, आक्रोली रोड, लोखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई यांनी फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात अरविंद अग्रवाल, अविनाश अग्रवाल, पांडुरंग पाटील, दिनेश गौतम पाटील आणि दीपक कीर्ती शाह यांचा समावेश आहे. शांती नगर पोलिसांनी दोन्ही आरोपीना नोटीस बजावून गंभीर गुन्ह्यात सोडून दिले. यामुळे या प्रकरणात कुणाचा वरदहस्त आहे. याबाबत चर्चा रंगलेली आहे. या पाच जणांनी फिर्यादीला अग्रवाल वेअरहाउस सोल्युशन प्रा. लि. चे नावे मौजे बडुनवघर ता. भिवंडी जि. ठाणे येथील सव्हे नंबर 20/57, 20/58, 20/94, 20/95, 20/96, 20/309, 20/310, 20/311 व सव्र्व्हे नंबर 20/312, हि जमिनीची मिळकत असल्याचे सांगितले. २० मे २०२२ रोजी टोकंन अग्रवाल वेअरहाउस सोल्युशन प्रा. लि कंपनीच्या खात्यावर दिले. सादर जमिनीच्या खरेदीसाठी फिर्यादीने अँग्रीमेंट फॉर सेल चे रजिस्टर नोटराईज 3 डाक्युमेंट बीफोरमी वर नमुद तीन कंपनीच्या नावाने ५ जुलै २०२२ रोजी बनविले.

त्या व्यवहारापोटी २ कोटी १३ लाख १ हजार रुपये २० मे, २०२२ ते २७ सप्टेंबर,२०२२ या कालावधीत ऑनलाईन, चेक व कॅश व्दारे देण्यात आले. पैसे दिल्यानंतर अरविंद आणि अविनाश अग्रवाल यांनी रजिस्टर करून देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अधिक चौकशी गंगुबाई आणि त्यांचा मुलगा दीपक यांच्याकडून माहिती मिळाली कि, मौजे वडुनवघर ता. भिवंडी जि. ठाणे येथील सव्हे नंबर, 20/94 ची जमीन ही बोगस पॉवर ऑफ अॅटर्णीचा वापर करून अवनिश अग्रवाल, अरविंद अग्रवाल, कमलेश पाटील, एजंट दिनेश गौतम पाटील, दिपक किर्ती शाह यांनी संगणमत करून अरविंद अग्रवाल व अवनिश अग्रवाल यांनी स्वताचे कंपनी अग्रवाल वेअरहाउस सोल्युषन प्रा. लि. चे नावे करण्यात आल्याचे उघडकीस आले. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचे समजताच आणि अविनाश आणि अरविंद अग्रवाल याना नोंदणी करण्याचे सांगताच जे करायचे ते करा पैसे देणार नाही. त्यानंतर फिर्यादीने बनावट कागदपत्र सादर करून व्यवहारात फसवणूक केल्याचे समजले आणि शांतीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page