डिजीटल अटकेसह कुरिअरच्या नावाने तिघांची फसवणुक
उत्तर सायबर सेल पोलिसांत तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जानेवारी २०२५
मुंबई, – डिजीटल अटकेसह एका निवृत्त प्राध्यापकासह दोन महिलांची अज्ञात सायबर ठगांनी कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी तीन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. गेल्या काही दिवसात कुरिअरसह डिजीटलच्या अटकेच्या नावाने अनेकांना विशेषता वयोवृद्धांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली असून अशा गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गोरेगाव येथे राहणाऱ्या तक्रारदार या सेवा निवृत्त आहेत. गेल्या नोव्हेंबर मध्ये ठगाने त्याना फोन करून त्याने तो आरबीआयआयच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या विरोधात हैद्राबाद येथे गुन्हा नोंद असल्याचे सांगून भीती दाखवली. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करा असे सांगितले. ठगाने त्याना विडिओ कॉल केला. सीबीआयचे सिकेट इन्वेस्टीगेशन असल्याचे भासवून त्याना भीती दाखवली. तुमच्या खात्यात जमा झालेल्या ५०० कोटी रुपये जमा झाले आहेत. त्या पैशात मनी लौंड्रीन्ग आणि दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा झाल्याचे सांगितले. डिजिटल अटकेच्या नावाखाली महिलेकडून १ कोटी १८ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने उत्तर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दुसरी घटना वृद्ध महिलासोबत घडली. ठगाने तिला पोलीस असल्याचे भासवले. चौकशीसाठी बेंगलोर येथे यावे लागेल असे सांगून भीती दाखवली. तुमच्या बँक खात्यात जे पैसे जमा झाले. त्यातून मनी लौंड्रीन्ग झाले आहे. बँक खात्याच्या मोबदल्यात दहा टक्के कमिशन मिळाल्याचे त्याना सांगितले. तुम्हाला नॅशनल सिक्रेट ऍक्ट फॉलो करावा लागेल असे त्याना सांगितले. या केस बाबत घरात कोणाला काही सांगायचे नाही, तुमच्या विरोधात अटक वॉरंट काढला आहे. सीबीआय अधिकारी खूप स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे खरी माहिती सांगावी अशी भीती दाखवली. दिल्लीला येथे यावे लागेल असे सांगितले. मात्र तेथे येणे शक्य नव्हते. खात्यात असलेली रक्कम त्याने भरण्यास सांगितली. डिजिटल अटकेच्या नावाखाली त्याने २५ लाख रुपये उकळले. हा प्रकार महिलेने त्याच्या घरच्यांना सांगितला. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
तिसरी घटना निवृत्त प्राध्यापकासोबत घडली. नोव्हेंबर महिन्यात त्याना फोन आला. फोन करणाऱ्याने त्याना त्याचे पार्सल दिल्ली विमानतळावर आल्याचे सांगितले. त्या पार्सल विरोधात तक्रार दाखल आहे. ठगाने त्याना स्काईप अप्स डाऊन लोड करण्यास सांगितले. तुमच्या मुला विरोधात गुन्हा नोंद आहे. त्याची चौकशी करायची असल्याचे सांगितले. कारवाईच्या नावाखाली त्याच्याकडून १ कोटी ६४ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तीन गुन्हे नोंद करून तपास सुरु केला आहे.