मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ डिसेंबर २०२४
मुंबई, – मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिलेल्या नियमांचे उल्लघंन करुन वाहन चालविणार्या चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी केलेल्या मोहीमेतर्ंगत १०७ जणांची नाकाबंदीचे आयोजन करुन ६३६९ वाहनांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी १८३१ वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आलीअसून त्यात मद्यप्राशन करुन चालविणार्या ७० चालकांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी २८ रिक्षा जप्त केल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत काही वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन होत असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांना प्राप्त झाले होते. या वाढत्या तक्रारीची वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेत वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनचालकाविरुद्ध धडक मोहीम सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर शनिवारी रात्री बारा ते पहाटे पाच या कालावधीत अशा वाहनचालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतर्ंगत संपूर्ण मुंबई शहरात १०७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात ६३६९ वाहनांची तपासणी करण्यात आली तर १८३१ वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.
यावेळी ७० वाहनचालक मद्यप्राशन करुन वाहन चालवित असल्याचे सापडले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी २८ रिक्षा जप्त केल्या आहेत. आगामी काळात अशाच प्रकारे वाहतूक पोलिसाकडून अशा बेशिस्त चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लघंन करणारे वाहनचालक निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमच्या १००, १०३ आणि ११२ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सर्वसामान्यांना आवाहन करण्यात आले आहे.