गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मेहुणीवर लैगिंक अत्याचार
पळून गेलेल्या ४० वर्षांच्या भावोजीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बहिण डॉक्टरकडे गेल्याची बतावणी करुन जेवण बनविण्यासाठी बोलाविलेल्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मेहुणीवर तिच्याच भावोजीने फळांच्या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन लैगिंक अत्याचार करुन तिचे मोबाईलवरुन अश्लील फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. हा प्रकार तिने कोणााही सांगू नये म्हणून त्याने तिला तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची तसेच बहिणीला घटस्फोट देण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन तिच्या ४० वर्षांच्या भावोजीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पिडीत मुलगी मूळची उत्तरप्रदेशच्या बहिराइचची रहिवाशी आहेत. तिच्या मोठ्या बहिणीचे आरोपीसोबत लग्न झाले होते. ती तिच्या पतीसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहते. २१ नोव्हेंबरला त्याने पिडीत मुलीला तिची बहिण आजारी आहे. ती डॉक्टरकडे गेली आहे, त्यामुळे तिने त्याच्या घरी जेवण बनविण्यासाठी आणले होते. घरी आल्यानतर त्याने तिला फळांच्या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध दिले होते. तिचे कपडे काढून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. मोबाईलवरुन तिचे अश्लील फोटो काढले होते. ते फोटो दाखवून तिला हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी तसेच तिच्या बहिणीला घटस्फोट देण्याची धमकी दिली होती.
बदनामीसह बहिणीच्या चितेंने तिने सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अखेर शुक्रवारी तिने हा प्रकार तिच्या बहिणीसह पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी पिडीत मुलगी मालवणी पोलीस ठाण्यात आली आणि तिने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून तिच्या भावोजीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन आरोपी भावोजीविरुद्ध ६४, ६४ (एफ), ६४ (२), (आय), ३५१ (२), १२३ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळाहून पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मालवणी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
ऍक्टींगचा बहाणा करुन मुलावर लैगिंक अत्याचार
वांद्रे येथील अन्य घटनेत ऍक्टींगचा बहाणा करुन एका सोळा वर्षांच्या मुलावर ५७ वर्षांच्या व्यावसायिकाने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत मुलगा अंधेरी येथे राहत असून तो आरोपीच्या परिचित आहे. शुक्रवारी २९ नोव्हेंबरला तो वांद्रे येथे आला होता. यावेळी आरोपीने त्याला ऍक्टींग येते का अशी विचारणा करुन त्याची उंची मोजण्याचा बहाणा करुन त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने त्याच्याशी अश्लील चाळे करुन तिच्याशी लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकाराने तो प्रचंड घाबरली आणि त्याने वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली.