सांताक्रुज येथे साडेसहा लाखांचा मुद्देमाल पळविला
अज्ञात व्यक्तीने खिडीतून घरात प्रवेश केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सांताक्रुज येथे एका फ्लॅटच्या खिडकीतनू प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने महिलेच्या पर्समधून सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
५० वर्षांची तक्रारदार महिा ही सांताक्रुज येथे राहत असून तिचे पती सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्यामुळे ती तिच्या आईसोबत राहते. बुधवारी २ ऑक्टोंबरला ती तिच्या आईसोबत रात्रीचे जेवण करुन झोपली होती. दुसर्या दिवशी तिला तिची पर्स खिडकीजवळ पडल्याचे दिसून आले. तिने पर्स उघडून पाहिले असता त्यात सोन्याचे बांगड्या कानातील रिंग, ७५० अमेरिकन चलन आणि सात हजार रुपयांची कॅश असा सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. तिच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. अज्ञात व्यक्तीने खिडकीतून आत प्रवेश करुन तिच्या पर्समधील हा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिने वाकोला पोलिसांना ही माहिती दिली. तिच्या तक्रारीवरुन वाकोला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.