ट्रॉम्बे येथे दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

आरोपी पतीसह दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जून 2025
मुंबई, – ट्रॉम्बे परिसरात दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी पतीसह दोघांविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एका गुन्ह्यांतील पिडीत मुलीची दोन दिवसांपूर्वी प्रसुती झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोळा वर्ष नऊ महिन्यांची ही पिडीत मुलगी मानखुर्द परिसरात राहत असून तिचा आरोपी तरुणासोबत बालविवाह झाला होता. ही मुलगी अल्पवयीन असल्याची माहित असताना त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. दोन दिवसांपूर्वी राजावाडी हॉस्पिटलमध्ये तिची प्रसुती झाली होती. हा प्रकार वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ट्रॉम्बे पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर या मुलीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून बालविवाहासह लैगिंक अत्याचाराचा हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दुसर्‍या घटनेत इंटाग्रामवर ओळख झालेल्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन 23 वर्षांच्या तरुणाविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोळा वर्षांची पिडीत मुलगी मालाड परिसरात राहत असून सध्या शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी तिची इंटाग्रामवर ओमकार नावाच्या एका तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. एकमेकांच्या संपर्कात असताना त्याने तिला प्रपोज करुन मानखुर्द परिसरात बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता.

सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी तिने दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मित्राविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास ट्रॉम्बे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page