एटीएम मशिन फोडून तीन लाखांची कॅश पळविली

सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने तिघांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जून 2025
मुंबई, – चेंबूर परिसरातील एका खाजगी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करुन तीनजणांच्या टोळीने एटीएम मशिन फोडून आतील तीन लाखांची कॅश घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. एटीएम सेंटरच्या सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संतोष वसंत शेळके हे डोबिवलीतील विष्णूनगर परिसरात राहत असून एका खाजगी बँकेत मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करतात. या बँकेचे कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात एक शाखा आणि एटीएम सेंटर आहे. गुरुवारी 5 जूनला दुपारी अडीच वाजता बँक कर्मचार्‍यांनी एटीएममध्ये तीन लाखांची कॅश जमा केली होती. एटीएमची तपासणी केल्यांनतर त्यात आठ लाख सात हजार पाचशे रुपये शिल्लक होते. शुक्रवारी सकाळी सव्वासहा वाजता एटीएम सेंटरमध्ये तीन तरुण आले होते. या तिघांनी बँकेचे एटीएम फोडून आतील कॅश चोरी केली होती. सुमारे तीन लाख रुपयांची कॅश आणि पंधरा हजाराची कॅसेट असा मुद्देमाल चोरट्याने पळवून नेला होता.

हा प्रकार नंतर सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे त्याने संतोष शेळके यांच्यासह इतर बँक कर्मचार्‍यांना ही माहिती दिली. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन एटीएम सेंटरच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात संबंधित तिघांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करुन मशिनचा खालील दरवाजा उघडून त्यातील तीन लाख रुपयांची कॅश आणि एक कॅसेट बॅगेत भरुन पलायन केल्याचे दिसून आले. ही माहिती नंतर नेहरुनगर पोलिसांना देण्यात आली. एटीएम सेंटरचे सीसीटिव्ही फुटेज देऊन बँकेच्या वतीने संतोष शेळके यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page