मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जून 2025
मुंबई, – मदतीचा बहाणा करुन एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात घडला. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 48 वर्षांच्या आरोपीस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
30 वर्षांची तक्रारदार महिला गोरेगाव येथे राहते. बळीत तिची दहा वर्षांची मुलगी आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता ही मुलगी घराजवळच असलेल्या एका दुकानात बिस्कीट आणण्यासाठी गेली होती. दुकानातून घरी जाताना तिच्या मागे एक कुत्रा लागला होता. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती, जवळच उभ्या असलेल्या आरोपीने तिची मदत करण्याचा बहाणा करुन तिचा हात पकडला होता. त्यानंतर तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता.
घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला होता. त्यानंतर तिच्या आईने गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यता आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.