एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिकणार्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
मानसिक नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जून 2025
मुंबई, – एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिक्षण घेणार्या रोहन रामफेर प्रजापती या 22 वर्षांच्या विद्यार्थ्याने रविवारी रात्री त्याच्याच हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. आर्थिक अडचणीसह अभ्यासाच्या तणावामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने पंख्याला गळफास घेऊन स्वतचे जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी जे. जे मार्ग पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. रोहनच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आली असून त्यांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या आत्महत्येच्या घटनेने रोहनच्या सहकारी मित्रांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
ही घटना रविवारी रात्री पावणेअकरा वाजता जे. जे हॉस्पिटल, अपना बॉईज हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावरील रुम क्रमांक 198 मध्ये घडली. याच रुममध्ये रोहन प्रजापती हा 22 वर्षांचा विद्यार्थी त्याच्या इतर सहकार्यासोबत राहत होता. रोहन सध्या ग्रँट मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिक्षण घेत होता. आर्थिक अडचणीमुळे तो काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता. त्यात त्याला अभ्यासाचा प्रचंड तणाव होता. त्यातून त्याला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्यातून रविवारी रात्री उशिरा त्याने त्याच्या हॉस्टेलच्या रुममध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
हा प्रकार नंतर त्याचा सहकारी रितेश राकेश विश्वकर्मा याच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर त्याने ही माहिती तेथील वरिष्ठ अधिकार्यांना दिली होती. त्यामुळे त्याला तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती संबंधित अधिकार्याकडून समजताच जे. जे मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रितेश विश्वकर्मा याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.
त्याच्या जबानीतून रोहन हा आर्थिक अडचणीसह अभ्यासाच्या तणावामुळे मानसिक तणावात असल्याचे उघडकीस आले होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने स्वतचे जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. रोहनच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियासह नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यांचीही पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. रोशनच्या आत्महत्येने अपना बॉईज हॉस्टेलमधील त्यांच्या सहकारी मित्रांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.