मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जून 2025
मुंबई, – बँकॉकहून आणलेलय वन्यजीवांच्या तस्करीचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका भारतीय प्रवाशाला या अधिकार्यानी अटक केली असून त्याच्याकडून दुर्मिळ जातीचे वन्यजीव हस्तगत करण्यात आले आहे. वन्यजीवाची तस्करी करणार्या ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या प्रवाशाची सीमा शुल्क विभागाकडून कसून चौकशी सुरु आहेत.
बँकाँकहून काही प्रवाशी दुर्मिळ जातीच्या वन्यजीवांची तस्करी करणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. ही तपासणी सुरु असताना एका भारतीय प्रवाशाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासह त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना दुर्मिळ वन्यजीव आढळून आले.
त्याच्या बॅगेतून चाको गोल्डन नी टॅरंटूला, टॅरंटुला, 50 जिवंत तर 30 मृत इगुआना, सहा ल्युसिस्टिक शुगर ग्लायडर, एक मृत फायर टेलेंड सनबर्ड, एक मृत पर्पल थ्रोटेड सनबर्ड, क्रेस्टेड फिंचबिल, मधफर अस्वल, ब्राझिलियन चेरी हेड कासव आदी दुर्मिळ वन्यजीव सापडले. ते सर्व वन्यजीव नंतर ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी आरोपी प्रवाशाविरुद्ध सीमा शुल्क कायदा 1962 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला या अधिकार्यांनी अटक केली.
प्राथमिक तपासात वन्यजीवांची तस्करी करणारी ही आंतरराष्ट्रीय टोळी असून या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे वन्यजीवांची तस्करी केल्याचे बोलले जाते. आरोपीला ते वन्यजीव कोणी दिले, मुंबईत तो वन्यजीव कोणाला देणार होता. त्याने यापूर्वीही वन्यजीवाची तस्करी केली आहे, याकामी त्याला कोणी मदत केली याचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.